व्हॅलेंटाईन स्पेशल लाव्हा केक (Valentine Special Lava Cake Recipe In Marathi)

Saumya Lakhan
Saumya Lakhan @cook_31557589
Mumbai

व्हॅलेंटाईन स्पेशल लाव्हा केक (Valentine Special Lava Cake Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
कितीही जणांसाठी
  1. 2मोठे पाकिट ओरियो बिस्किटे
  2. दूध
  3. इनो लेमन फ्लेवर
  4. चोको चिप
  5. कॅडबरी

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    प्रथम एका भांड्यात बिस्किटे आणि त्यातील व्हाईट भाग वेगळा करून वरील बिस्किटांचा भाग मिक्सरला लावून घ्या. आणि आतील व्हाईट क्रिम चा काही भाग सजावटीसाठी ठेवा.

  2. 2

    आता मिक्सर मधील मिश्रण एका भांड्यात ओतून त्यात आवश्यक ते नुसार दूध ओतून चांगले एकाच दिशेने फेटून घ्या. मिश्रण चांगले एकजीव झाले की त्यात एक छोटा चमचा इनो घालून ते ऍक्टिव होण्यासाठी एक चमचा दूध ओतून पुन्हा एकदा एकजीव करा.

  3. 3

    आता दुसऱ्या बाजूला गॅस चालू करून कढई वर झाकण ठेवून कढई मंद आचेवर गरम करायला ठेवा. आता हार्ट शेप केक पात्राला आतून बटर लावून त्यावर बटर पेपर लावा.

  4. 4

    आता वरील अर्धे मिश्रण पात्रात ओतून वरून चोको चिपस आणि कॅडबरी तुकडे घालून वरून पुन्हा उरलेले मिश्रण ओता. आणि हे पात्र कढईत स्टॅण्ड वर ठेवून वरून झाकण ठेवून अर्धा तास बेक करा. नंतर अर्धा तासानंतर झाकण काढून केक बेक झाला की नाही हे सुरी घालून चेक करा.सुरीला केक चिकटला नाही तर केक तयार... केक कढईतून काढून थोडा थंड झाला की वरून चाॅकलेट सिरप ने सजवा. व २० मिनिटे फिज मध्ये सेट करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Saumya Lakhan
Saumya Lakhan @cook_31557589
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes