"मावा बर्फी"
कुकिंग सूचना
- 1
मावा किसून किंवा बारीक तुकडे करून घ्या.. साखर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या
- 2
गॅसवर पॅन गरम करून त्यात मावा घालून दहा मिनिटे मंद गॅसवर भाजून घ्या.. दोन मिनिटात नरम होतो.. सतत हलवत रहा पाच मिनिटांत मावा पातळ होईल..
- 3
अजून पाच मिनिटांत घट्ट होईपर्यंत हलवत रहा.. थोडासा प्लेटमध्ये काढून थंड झाल्यावर त्याची गोळी बनते का ते पहा..गोळी बनल्यावर हवी ती कंन्सस्टंटी झाली आहे असे समजावे.. व पॅनमध्ये ही एकत्र गोळा बनू लागतो..
- 4
गॅस बंद करा व मिश्रण प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवा.. पुर्ण थंड झाल्यावर त्यात साखर आणि थोडे बदाम पिस्त्याचे काप मिक्स करा.. ट्रे मध्ये बटर पेपर घालून त्यावर उरलेले बदाम पिस्त्याचे काप,केशर तुकडे घालावे..
- 5
मिश्रण एकजीव करून ट्रेमध्ये पसरवून घ्या..व एक तास सेट होण्यासाठी ठेवा किंवा पंधरा मिनिटे फ्रिजमध्ये ठेवावे.. लगेच सेट होईल.. बोर्डवर काढून हव्या त्या आकारात वड्या कापून घ्या.. सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून सर्व्ह करा..
- 6
Keywords
Similar Recipes
More Recipes





















टिप्पण्या