शेपूची भाजी (Shepuchi Bhaji Recipe In Marathi)

Padma Dixit
Padma Dixit @Padmadixit22

शेपूची भाजी (Shepuchi Bhaji Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 - 25 मि
5 - 6 सर्व्हिंग्ज
  1. 2पेंडी - शेपूची भाजी
  2. 10ते बारा लसूण पाकळ्या
  3. 3हिरवी मिरची
  4. 1/2 चमचाजीरे
  5. 1/2 चमचाहळद
  6. हिंग
  7. 1कांदा बारीक चिरलेला
  8. 2 चमचेतेल
  9. 2 चमचेमुगाची डाळ
  10. 2 वाट्यापाणी (भाजी शिजविण्यासाठी)
  11. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

20 - 25 मि
  1. 1

    शेपू ची भाजी निवडून दोन ते तीन पाण्यात स्वच्छ धुऊन घ्यावे त्यानंतर बारीक चिरून घ्या.
    एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यावे त्यात फोडणी तयार करावी जीरे हिंग व लसूण लाल झाल्यावर त्यात कांदा व हिरवी मिरची घालून छान परतून घ्यावे.

  2. 2

    नंतर तर शेपू आणि मुगाची डाळ घालून पाच मिनिट परतून घ्या नंतर त्यात हळद घालावी मग परत पाच मिनिट परतून घ्यावे

  3. 3

    त्यात गरम पाणी घालून चवीपुरते मीठ घालावे व पाच ते दहा मिनिट मंद गॅसवर झाकण ठेवून शिजवून घ्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Padma Dixit
Padma Dixit @Padmadixit22
रोजी

Similar Recipes