कढाई पनीर

कढाई पनीर
कुकिंग सूचना
- 1
कढाई पनीर साठी प्रथम खास मसाला रेडी करायचा पॅनमध्ये वर दिलेले खडे मसाले मिरच्या परतुन भाजा नंतर थंड करून त्याची जाडसर पावडर रेडी करा
- 2
भाजीची इतर तयारी कांदे, टोमॅटो, सिमला मिरची, कोथिबिर, मिरच्या कापुन ठेवा, टोमॅटोची प्युरी व आलेलसुण पेस्ट रेडी करा
- 3
कढईत बटर गरम करून जिरे टाकुन परता नंतर त्यात कांदा व सिमला मिरचीचे मोठे तुकडे, टोमॅटोचे तुकडे करता नंतर त्यात हळद, तिखट, तयार केलेली मसाला पावडर, मिठ टाकुन थोडा वेळ परता गॅस बंद करा
- 4
पॅनमध्ये बटर गरम झाल्यावर जिरे, तेजपत्ता, कोथिंबिर टाकुन परता नंतर त्यात आले लसुण पेस्ट, मिरच्यांचे तुकडे, चिरलेला टोमॅटो थोड मिठ टाकुन चांगले परता त्यातच टोमॅटोची पेस्ट मिक्स करून परता व झाकण ठेवुन५-७ मिनिटे शिजवा
- 5
मिश्रण शिजल्यावर त्यात हळद, तिखट, जिरे पावडर, तयार केलेली मसाला पावडर मिक्स करा व परता परत २-३ मिनिटे झाकण ठेवुन शिजवा
- 6
थोडे पाणी व कसुरी मेथी मिक्स करा कढईत ले पनीर, कांदा, सिमला मिरचीचे मिश्रण मिक्स करा
- 7
सर्व हलक्या हाताने मिक्स करा थोडा गरम मसाला व हनी मिक्स करून परता शेवटी चविनुसार मिठ व फ्रेश क्रिम मिक्स करून परता व गॅस बंद करून झाकण ठेवा २ मिनिटे आपली कढाई पनीर रेडी
- 8
डिश मध्ये गरमागरम कढाई पनीर ठेवुन वरून बटर, क्रिम व कोथिंबीर पसरवा कांदा कोथिंबीर बाजुला डेकोरेट करून डिश सर्व्ह करा सोबत रोटी, नान, कुलचा देता येईल
Keywords
Similar Recipes
More Recipes

























टिप्पण्या