खेकडा मसाला/ चिंबोर्या मसाला

खेकडे बनवायला जरा कठीण वाटतात. पण खायला खूप चविष्ट लागतात. असं म्हणतात की खेकडा खाल्ल्याने बुद्धीची वाढ होते. खेकडे साफ करता येत नसतील तर कोळीण खेकडा साफ करून देतात. खेकड्याला चिंबोरी असे पण म्हणतात.
मी लग्नाच्या आधी कधीच खेकडे बनवले नव्हते आणि खाल्ले पण नव्हते. कारण माझ्या माहेरी फक्त व्हेज जेवण बनवलं जायचं. पण लग्नानंतर सासुबाईंच्या कडून नाॅनव्हेज बनवायला शिकले. तेव्हा खेकडे कसे साफ करावे आणि कशाप्रकारे ते चविष्ट बनवावे हे मला सासुबाईंनी खूप छान प्रकारे शिकवले. त्यामुळे मला नाॅनव्हेज जेवण खूप छान प्रकारे बनवता येते.

कुकिंग सूचना
- 1
खेकड्याच्या डेंग्या (मोठे पाय) तोडून ठेवावे. मग स्वच्छ धुवून साफ करावे. किंवा कोळणी कडून खेकडे साफ करून घ्यावे.
- 2
कढई मधे तेल घालून त्यात एक बारीक चिरलेला कांदा घालून परतावा. मग त्यात मालवणी मसाला, हळद, काश्मीरी मिरची पावडर घालून जरा परतून त्यात लगेचच थोडं पाणी घालून परतावे म्हणजे मसाले करपत नाहीत.
- 3
त्यात साफ केलेले खेकडे घालून मग मीठ आणि गरम मसाला घालून मिक्स करून पाणी घालून खेकडे शिजवायला ठेवावे.
- 4
खेकड्याच्या बारीक नांग्या म्हणजे छोटे पाय मिक्सर मधे घालून मग त्यात थोडे पाणी घालून वाटून त्यातला रस गाळून शिजवत ठेवलेल्या खेकड्यांमधे घालून मिक्स करावा. मग एका कढईत एक टीस्पून तेल घालून त्यात खडे मसाले, आलं लसूण, आणि १/२ कांदा, १ वाटी ओलं खोबरं हे सर्व घालून खरपूस भाजून ते मिश्रण गार झाल्यावर मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे.
- 5
शिजवत ठेवलेल्या खेकड्यांमधे खोबर्याचे वाटण घालून परत चांगले शिजवून घ्यावे.
- 6
गरमागरम खेकडा/ चिंबोरी मसाला चपाती, भात आणि सॅलेड बरोबर सर्व्ह करावा.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या