शेवग्याच्या शेंगांचे डोसे

शेवग्याच्या शेंगा आपण वरणातील, आमटीतील किंवा सुकी भाजी करून खातो. सूप ही बनवतो.
आज मी वेगळा पदार्थ तयार करून बघितला. तो खूपच छान झाला. तुम्ही नक्की करून बघा.
शेवग्याच्या शेंगांचे डोसे
शेवग्याच्या शेंगा आपण वरणातील, आमटीतील किंवा सुकी भाजी करून खातो. सूप ही बनवतो.
आज मी वेगळा पदार्थ तयार करून बघितला. तो खूपच छान झाला. तुम्ही नक्की करून बघा.
कुकिंग सूचना
- 1
शेंगांची साल काढून तुकडे करून, स्वच्छ धुऊन घेणे. छोट्या कुकरमध्ये शेंगांचे तुकडे, हळद, मीठ, थोडेसे पाणी घालून, झाकण लावून 2-3 शिट्टया करून घेणे.
- 2
आलं लसूण हिरव्या मिरच्या यांची पाणी न घालता पेस्ट करून घेणे. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घेणे. एका मोठ्या बाऊलमध्ये पुरणाची चाळणी ठेवून घेणे.पुरणाच्या चाळणीमध्ये शेंगा व त्याचे पाणी ओतून घेणे.
- 3
पावभाजी मॅशरने किंवा चमच्याने शेंगा मॅश करून घेणे. उरलेली सालं म्हणजे काड्या बाजूला काढून टाकणे. गर व पाणी व्यवस्थित मिक्स करून घेणे. त्यात आलं,लसूण,मिरचीची पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स करून घेणे.
- 4
चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घेणे. बारीक रवा व तांदळाचे पीठ घालून घेणे.
- 5
चवीप्रमाणे मीठ घालून घेणे. * मीठ घालताना आपण चाखून घेणे. शेंगा शिजवताना मीठ घातलेले आहे.
दोन टेबलस्पून दही घालून घेणे. सर्व मसाले घालून घेणे. - 6
व्यवस्थित सर्व मिक्स करून घेणे. झाकण ठेवून दहा मिनिटे बाजूला ठेवणे. गॅसवर पॅन तापत ठेवणे. पॅन तापलं की त्याला तेल लावून घेणे.
- 7
मिश्रण व्यवस्थित हलवून घेणे. थोडेसे पाणी हवे असल्यास घालून पीठ व्यवस्थित करून घेणे.थोडेसे तीळ पसरून घेणे.लगेच मिश्रण घालून पसरून घेणे.वरुन थोडेसे तीळ घालून घेणे.कडेने तेल सोडावे.वरची बाजू कोरडी झाली की पलटवून दुसरी बाजू भाजून घेणे.
- 8
अशाप्रकारे सर्व डोसे करून घेणे.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes

























टिप्पण्या