आळुवडी (aloo wadi recipe in marathi)
#रेसिपिबुक #week5
#पावसाळी मज्जा
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य
- 2
एका वाडग्यात पिठ घ्या व त्यातआल मिरची लसुणची पेस्ट घालून लाल तिखट घालावे.
- 3
आता धनेजिरे पुड व हळद घालून त्यात गुळ घाला.
- 4
आता तिळ घाला व चिंचेचा कोळ घाला व मिठ घाला.
- 5
लागेल तसे पाणी घालून पिठ मिक्स करून घ्या भजीला पिठ करतो तसे पिठ करून घ्यावे.
- 6
आता एका प्लेट ऊपडी ठेवून त्यावर आळुचे पान एक बाजु ऊलटी एक बाजु सरळ अशी पान ठेवून त्यांना चिंच लावावी असे केल्याने जर पान खाजेचि असतिलतर घश्याला खाज येत नाही.
- 7
आता पानांना बेसन पिठ पिठ लावून घ्यावे आता एक पान सरळ ठेवून त्याला चिंच लावुन पिठ लावुन घ्यावे असे सर्व पानावर पिठ लावुन घ्यावे.
- 8
आता फोटोत दाखविल्याप्रमाणे दोन्ही रोल तयार करून घ्यावे.
- 9
आता सर्व बाजुने पान फोल्ड करून घ्यावे.
- 10
आता दोन्ही रोल तयार आहेत चाळणीवर तेल लावुन घ्या.
- 11
आता गॕस आॕन करून त्यावर एका टोपात पाणी गरम करण्यासाठी ठेवा चाळणीत आळुवडीचे रोल ठेवून ती चाळण टोपावर ठेवा.
- 12
आता चाळणीवर झाकण ठेवून 15 मिनिटे आळुवडीचे रोल वाफवून घ्यावे.15 मिनिटांनी झाकण काढून रोल थंड करण्यासाठी ठेवावे रोल थंड झाले की रोला वड्या कापुन घ्यावे.
- 13
आता एका पॕनमध्ये सर्व वड्या शॕलोफ्राय करून घ्यावा व सव्हिंग प्लेट मध्ये वड्या काढून गरमा गरम आळुवडी सव्हॕ करा मस्त पावसाची मज्जा घेत वडी खा माझी ही रेसिपि नक्की करून बघा.
Keywords
Similar Recipes
More Recipes











































टिप्पण्या