दुधी भोपळ्याचेच फूलके आणि दुपोडी पोळी (dudhi bhoplyache fulke ani dupodi poli recipe in marathi)

Swati Pote
Swati Pote @cook_24317961

दुधी भोपळा हा आरोग्याला पोषक, पौष्टिक आहे. दुधी भोपळा ही विषनाशक औषधी भाजी असून त्यात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस व अन्य खनिजे आहेत. तंतुमय, रेषादार तसेच जीवनसत्त्व 'क' असलेली फळभाजी दुर्लक्षित फळभाजी आहेत.

दुधी भोपळा म्हटले म्हणजे अनेक जण नाके मुरडतात दुधी भोपळा हे देखील शरीराला अनेक रोगांपासून वाचविण्यास मदत करतो. आपल्या पैकी अनेक लोकांनी हि भाजी आवडत नसेल परंतु त्याचे होणारे फायदे कळल्यावर आपण हि भाजी नक्की आवडीने खाल.

दुधी भोपळ्याची भाजीची कृती तर सर्वाना माहीतच आहे.आज मी दुधी भोपळ्याचेच फूलके आणि दुधी भोपळ्याचीच दुपोडी पोळीची रुचकर रेसिपी सांगणार आहे.

ज्यांना दुधी भोपळा आवडत नाही किंवा लहान मुलाच्या पण लक्षात येणार नाही. की आपण दुधी भोपळा खात आहे. ते पण दुधी भोपळ्याचेच फूलके आणि दुधी भोपळ्याचीच दुपोडी पोळी आवडीने खातील.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1दुधी भोपळा अर्धा मिक्सरच्या भांड्यात थोडे पाणी टाकून जाड रस(प्युरी) केलेला
  2. २०० ग्राम ते ३०० ग्रॅम दुधी भोपळ्याच्या रसात मावेल एवढे गव्हाचे पिठ
  3. चविनुसारमिठ
  4. १छोटा चमचापिठात टाकण्यासाठी तूप
  5. आवश्यकतेनुसार चपातीला वरून तूप लावण्यासाठी
  6. आवश्यकतेनुसारपाणी

कुकिंग सूचना

30 मिनट
  1. 1

    प्रथम दुधी भोपळ्याचा जाड रस(प्युरी) करून ती एका परातीत काढून घ्यावी,त्यात १छोटा चमचा तूप, मिठ व मावेल एवढे पिठ टाकून, पाणी मिसळायचे असेल तर आवश्यतेनुसार पाणी टाकून मग कणिक सैलसर मळून घ्या. कणिक मळताना फार घट्ट किंवा फार पातळ मळू नये. पीठ मळून झाल्यानंतर तुपाचा हात लाऊन अर्धा तास झाकून बाजूला ठेवा म्हणजे आपल्या पोळ्या चांगल्या होतील.

  2. 2

    दुधी भोपळ्याचे फूलके :-

    आता कणकीचे छोटे छोटे गोळे बनवून मीडियम साइजची पातळ पोळी लाटावी.

    तवा गरम करून त्यावर लाटलेली पोळी दोन्ही बाजूने लाइट शेका आणि तवा गॅसवरून उतरवून चिमट्याच्या मदतीने सरळ गॅसवर पोळीला दोन्ही बाजूला शेका.ती फुगून मोठी होइल. हे झाले आपले दुधी भोपळ्याचे पौष्टिक फूलके. वरून तूप लावून भाजी सोबत सर्व करा.

  3. 3

    दुधी भोपळ्याची दुपोडी पोळी (डबल घडीची पोळी):-

    पोळी लाटताना थोडय़ा थोडय़ा पिठावर हलकेच लाटावी. गोल लाटून थोडंत तूप लावून पसरून घडी घालावी व त्यावर पुन्हा तूप लावून त्रिकोणी घडी घालावी. पोळी हलके लाटून मोठी करावी. सगळीकडे सारखीच जाड लाटली गेली पाहिजे. त्यासाठी ती मधून मधून उलटून लाटावी. पोळी उत्तम लाटली गेली तरच पोळी फुगते.

  4. 4

    पोळी भाजण्यासाठी तवा मध्यम तापलेला हवा. कमी तापला तर पोळीच्या खालचा भाग कडक होऊ लागेल. तवा जास्त तापवला तर पोळी फुगण्याआधी खालचा भाग जळू लागेल. तवा मध्यम गरम असला की म्हणजेच पोळी फूगू लागते. आता उलटून टाकली की उरलेलं फुगणं पूर्ण होतं.पोळी खाली काढून उभी आपटली की वाफ निघून जाते. पोळीत ती शोषली न गेल्यानं पोळी गिचगिचीत होत नाही. मऊ, खुसखुशीत पातळ अशी पोळी तयार होते. दुपोडी पोळी झाल्या नंतर तूप लावून गरम गरम वाढावी.

  5. 5

    दुधी भोपळ्याचे फूलके आणि दुपोडी पोळी रुचकर लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Swati Pote
Swati Pote @cook_24317961
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes