मिनी मुगडाळ कचोरी (moong dal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12
कचोरी
कुकिंग सूचना
- 1
मूग डाळ चार तास पाण्यात भिजत ठेवावी व मिक्सरला जाडसर वाटून घ्यावी, भुजिया शेव मिक्सरला फिरवून घ्यावी.
- 2
एका पॅनमध्ये २ टेबल स्पून तेल घेऊन त्यात हळद, मीठ,लाल मसाला गरम मसाला, धने पावडर, जिरे पावडर साखर घालून व्यवस्थित मिक्स करावे.
- 3
वाटलेली मुगडाळ त्यात घालून ५ मिनिटं त्याला शिजू द्यावे त्यानंतर वाटलेली भुजिया शेव त्यात घालून घ्यावी हे व्यवस्थित सारण तयार करून घ्यावे व थंड करत ठेवावे.
- 4
एक बाऊल मध्ये मैद्याचे पीठ घेऊन त्यात तेलाचे मोहन घालून चवीपुरतं मीठ घालावे व पीठ मळून मळून घ्यावे पीठ हातात घेतल्यावर त्याची मुठी बनली पाहिजे, म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित झाल आहे, आता त्यात थोडं थोडं पाणी घालून त्याचा घट्टसर गोळा करून घ्यावा जेणेकरून आपली कचोरी खुसखुशीत होईल
- 5
तयार झालेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून त्याची पारी बनवावी
- 6
पारी मध्ये सारण व्यवस्थित भरून त्याला व्यवस्थित बंद करून थोडा हाताने दाबून घ्यावे.
- 7
कढईत तेल गरम करून त्यात या कचोऱ्या सोडाव्या व गॅस कमी करून मंद आचेवर व्यवस्थित तळून घ्याव्या
Keywords
Similar Recipes
More Recipes






















टिप्पण्या