कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
डाळकांदा (पूूरेेपूूर.. कोल्हापूर...) (daal kanda recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
डाळकांदा (पूूरेेपूूर.. कोल्हापूर...) (daal kanda recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

डाळकांदा (पूूरेेपूूर.. कोल्हापूर...) (daal kanda recipe in marathi)

शर्वरी पवार - भोसले
शर्वरी पवार - भोसले @Epicurean_Gourmet
दुबई, युएई.

#KS2 डाळकांदा म्हटल्यावर आपसूक तोंडाला पाणी न सुटणारा
अगदी नामानिराळाच! भाजीचा कंटाळा आला किंवा घरी भाजी नसेल तर सोप्प्या आणि सुटसुटीत पदार्थांमध्ये पिठल्या खालोखाल डाळकांद्याचा नंबर लागतो. तुरडाळ, मूगडाळ, मसूरडाळ अगदी मटकीच्या डाळीचा ही डाळकांदा आवडीने चाखला जातो.
लहानपणची एक मजेशीर आठवण अशी आहे की डाळकांदा बनवून तो पार लोकांनी खाईतोवर माझी सुगरण आई आणि काकी कायम दडपणाखाली असायच्या! आई काकीला सारखी विचारायची "डाळ अखंड दिसतेय ना?" तेव्हा ती गोष्ट नीटशी कळत नव्हती. पण, स्वयंपाक करायला घेतला तसं हळूहळू सारंच समजायला लागलं. लग्नानंतर, सासूबाईंनी अखंड डाळीचे "जिवंत डाळ" (😂) असं नामकरण केलं. त्याचं असं आहे की डाळकांदा शिजवताना डाळ तर शिजली पाहिजे आणि त्यासोबत डाळीचा दाणा अखंड रहायला हवा. जर डाळ जास्त शिजली की माझे वडील आणि काका त्याला "माडगं" 😅म्हणायचे! तर अशी ही "डाळकांदा" कहाणी!
"डाळकांदा" खरंतर पश्चिम महाराष्ट्राची ओळख च जणू! कारण, इथं प्रांतोप्रांती त्याची बनवण्याची पध्दत, मसाल्यांचा बदल आणि त्यामुळे तोंडात येणाऱ्या विविधांगी चवीचा मास्टरस्ट्रोक खरंतर निव्वळ अवर्णनीय! तर आज आपण बघूया डाळकांदा बनवण्याची कोल्हापूरी पध्दत..

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

साधारण २० मिनिटे
३ - ४ जणांना
  • 1 वाटीतुरीची डाळ
  • 1मोठ्ठा कांदा बारीक चिरून / भिजलेेल्या तूूूरडाळीच्या समान प्रमाणात
  • फोडणीचे साहित्य -
  • मोहोरी,
  • जीरे ,
  • हिंग,
  • कडीपत्ता डहाळी
  • 2छोट्या हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  • 1/2 चमचाहळद
  • 1 टीस्पून कश्मिरी लाल तिखट
  • 1 टीस्पून कांदा लसूण मसाला
  • 2 चमचेतेल
  • चवीनुसारमीठ
  • शिजवण्यासाठी थोडे पाणी
  • 1 चमचाकोथिंबीर बारीक चिरून
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

साधारण २० मिनिटे
  1. 1

    सुरुवातीला, तूरडाळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजवून ठेवावी.

    डाळकांदा (पूूरेेपूूर.. कोल्हापूर...) (daal kanda recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका कढईत तेल घालून फोडणी करावी. त्यावर बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा घालून परतावे.

    डाळकांदा (पूूरेेपूूर.. कोल्हापूर...) (daal kanda recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    नंतर त्यात हळद, कश्मिरी तिखट आणि कांदा-लसूण मसाला घालून तेल सुटेतोवर परतावे.

    डाळकांदा (पूूरेेपूूर.. कोल्हापूर...) (daal kanda recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    त्यापाठोपाठ, भिजलेली डाळ निथळून छान मिक्स करावी. एक वाटी पाणी आणि चवीनुसार मीठ घालून झाकण लावून डाळकांदा शिजवून घ्यावा.

    डाळकांदा (पूूरेेपूूर.. कोल्हापूर...) (daal kanda recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो

  5. 5

    डाळ ३/४ शिजल्यावर गैस बंद करुन झाकण लावून ठेवावे. कढईतील वाफेवर डाळ पूर्ण आणि अखंड शिजते, ती मोडत नाही. तयार डाळकांदा भाकरी बरोबर सर्व्ह करावा.

    डाळकांदा (पूूरेेपूूर.. कोल्हापूर...) (daal kanda recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    डाळकांदा (पूूरेेपूूर.. कोल्हापूर...) (daal kanda recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

शर्वरी पवार - भोसले
शर्वरी पवार - भोसले @Epicurean_Gourmet
06 मे 2021 07:05 रोजी
दुबई, युएई.
अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकरप्राणवल्लभे ।ज्ञानवैराग्यसिद्ध्य भिक्षां देहि च पार्वति ।।
पुढे वाचा

टिप्पण्या (4)

Sharmila
Sharmila @Sharmila
13 मे 2021 16:49
🤤
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

Kolhapuri डाळ कांदा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. कोल्ड कॉफी (cold coffee recipe in marathi)
  2. "खुसखुशीत बाकरवडी" (bhakarwadi recipe in marathi)
  3. व्हॅनिला आईस्क्रिम (vanilla icecream recipe in marathi)
  4. कुकी आईस क्रीम (cookie ice cream recipe in marathi)
  5. मिक्स फ्रुट आईसक्रीम (mix fruit ice cream recipe in marathi)
  1. करकंबची बाजार आमटी (karkambichi bajar amti recipe in marathi)
  2. कच्च्या कैरीचे आईस्क्रीम (kachha kairche ice cream recipe in marathi)
  3. कोल्हापूरी अख्खा मसूर (रेस्टॉरंट स्टाईल) (kolhapuri aakha masoor recipe in marathi)
  4. कॅरेमल पिस्ता कुल्फी (carmel pista kulfi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14973725
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close