वाटली डाळ (प्रेशर कुक) (vaatli daal recipe in marathi)

#PCR
"वाटली डाळ" किंवा "मोकळं पिठलं/मोकळा झुणका" ही माझ्या आईची युनिक रेसिपी! कारण सर्वसाधारणपणे वाटली डाळ वाटून ती लगेचच फोडणीत ढकलली जाते. आई मला नेहमी सांगायची की अशा वाटल्या डाळीला तेल नेहमीपेक्षा जरा जास्तच लागतं. म्हणूनच, ती डाळ वाटून प्रेशर कुक करून नंतर कमी तेलात फोडणी करायची.. ती तशी पहिल्यापासूनच हेल्थ कॉन्शस होती. तेल किती घालावे, कुठल्या सिझनमध्ये कोणते तेल वापरावे हे सगळं तिच्याकडूनच ग्रहण केलं गेलं.. डॉक्टर, डाएटिशीयन मी नंतर झाले. पण, त्या विषयाचं बाळकडू लहानपणीच प्यायले होते बहुधा..
तसंच, आईची ही रेसिपी कांदा-लसूण विरहीत असल्याने टिकाऊ बनते आणि प्रवासात उपयोगी पडते. लहानपणी, हादग्याची खिरापत म्हणून मी दरवर्षी वाटली डाळच न्यायचे. कॉलेजमध्ये गेल्यावरही मला बरेचदा हॉस्टेलमध्ये जायला निघताना मोठ्ठा डबाभर वाटली डाळ मिळायची..
खूपच वेगळी आणि साधीसरळ प्रेशर कुकड् रेसिपी आहे.. नक्की सगळ्यांना आवडेल...

कुकिंग सूचना
- 1
डाळ स्वच्छ धुवून साधारण ४ - ५ तासांसाठी भिजवून ठेवावी.
- 2
नंतर मिक्सरमध्ये, उपसून घेतलेली डाळ + आलं + हिरवी मिरची + जीरे दरदरीत (हरवाळ) वाटून घ्यावे. २ चमचे डाळ बाजूला काढून ठेवावी.
- 3
कुकरच्या भांड्यात वाटलेल्या डाळीच्या मिश्रणात थोडे मीठ, हळद, अख्खी डाळ आणि पाव वाटी पाणी शिंपडून नीट मिक्स करावे.
- 4
भांडे कूकरमध्ये ठेवून ३ शिट्या करून घ्याव्यात.
- 5
कुकर थंड झाल्यावर डाळीचे मिश्रण हाताने फोडून बारीक चुरा करावा. कधीतरी पाणी कमी पडते आणि मिश्रण खूप कडक होते, ते हाताने सहजासहजी फुटत नाही. अशावेळी, त्याला सरळ किसणीवर किसून घ्यावे.
- 6
नंतर एका कढल्यात तेल तापवून मोहोरी-हिंगाची फोडणी करून घ्यावी. एखाद-दोन मिरच्यांचे मोठे तुकडे पण घालावे.
- 7
वाटलेल्या डाळीचा उकडवून घेतलेला चुरा फोडणीत घालून त्यात चवीनुसार मीठ आणि साखर पेरावे. नीट मिक्स करून ५ मिनिटे दणदणीत वाफ काढावी.
- 8
तयार वाटली डाळ ओले खोबरे पेरून खाण्यास द्यावी.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (8)