कलिंगडाचे सांदण (Kalingadhache Sandan Recipe In Marathi)

आपण कलिंगडाची साले फेकून देतो ती फेकून न देता त्याचा असा उपयोग करता येतो
कलिंगडाचे सांदण (Kalingadhache Sandan Recipe In Marathi)
आपण कलिंगडाची साले फेकून देतो ती फेकून न देता त्याचा असा उपयोग करता येतो
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कलिंगडाच्या साली घेऊन त्याचा पांढरा गर किसणीवर किसून घ्यावा
- 2
त्यानंतर १/२ वाटी उकडीचे तांदूळ किंवा जाडा रवा भाजून घ्यावा. (तांदूळ पेक्षा जाडा रवा वापरल्यास उत्तम)
- 3
भाजलेले तांदूळ मिक्सरवर रवाळ वाटून घ्यावेत
- 4
नंतर वाटलेले तांदूळ, किसलेला कलिंगडाचा गर, गूळ, वेलची पावडर, चवीनुसार मीठ घालून एकत्रित करून घ्यावे (गूळ व्यवस्थित वितळून घ्यावा)
- 5
हे मिश्रण एका पातेल्यात किंवा कूकरच्या डब्यात तेल लावून ओतावे व घट्ट झाकण लावून घ्यावे व कुकर बंद करावा
- 6
कुकर गॅस वर ठेऊन गॅस सुरु करावा व कूकरच्या ४-५ शिट्ट्या काढून घ्याव्यात
आपलं कलिंगडाचे सांदण तयार....त्यानंतर त्याच्या वड्या पाडाव्यात - 7
तुम्ही वरून ड्राय फ्रुट्स घालू शकता
Keywords
Similar Recipes
More Recipes











टिप्पण्या