रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १२ उकडलेली अंडी (१डझन)
  2. २ वाटी चण्याच्या डाळीचे पीठ
  3. १/२ वाटी तांदळाचे पीठ
  4. २ टेबलस्पून लाल मिरची पावडर
  5. १ टेबलस्पून गरम मसाला (एव्हरेस्ट)
  6. १ टेबलस्पून धणे जिरे पावडर
  7. १/२ टेबलस्पून हळद
  8. १ टेबलस्पून मीठ
  9. १ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
  10. तळण्यासाठी तेल
  11. २ वाट्या पाणी (पीठ भिजवण्यासाठी)

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम अंडी कुकरला लावून उकडून घ्यावी. उकडून झाल्यावर अंडी थंड झाल्यावर त्यावरील कवच काढून प्रत्येक अंड्याला सुरीच्या साहाय्याने बारीक चिर पाडून घ्यावी. जेणेकरुन आपण अंड्याला जो मसाला लावणार आहोत तो अंड्याच्या आत पर्यंत लागेल.

  2. 2

    एका प्लेट मध्ये लाल मिरची पावडर, धणे जिरे पावडर, गरम मसाला, (वरील प्रमाणानुसार),मीठ१/२ टेबलस्पून हे सर्व एकत्र करून चांगले मिक्स करून घ्यावे. आणि नंतर एक - एक अंडे त्या मसाल्यात चांगले घोळवून घ्यावे. असे करत असताना आपण अंड्याला जी चिर पाडली आहे त्यातही मसाला जाईल याची काळजी घ्यावी.

  3. 3

    कढईत तेल घेऊन ते मोठ्या आचेवर गरम करण्यास ठेवावे. आता एका वाडग्यात चण्याच्या डाळीचे पीठ, तांदळाचे पीठ, हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर (प्रमाण वर दिलेले आहे)१/२ टी स्पून मीठ घेऊन त्यात थोडे थोडे पाणी घालून चांगले मिक्स करावे. गुठळ्या राहता कामा नये. आणि आता त्या मिश्रणात मसाला लावलेले अंडे घोळवून कढईत तापत ठेवलेल्या तेलात मध्यम आचेवर अंडावडा तळून घ्यावा.

  4. 4

    अंडावडा मध्यम आचेवर तळून झाल्यावर ते पेपरवर काढून (शक्यतो टिश्यू पेपरवरच) घ्यावेत. जेणेकरुन जास्तीचे तेल पेपर षोशून घेईल. आता ताज्या पावाला मधुन कापून त्याला हिरवी चटणी (available असेल तर) आणि बारीक चिरलेला कांदा घालून त्यात अंडावडा ठेऊन तळलेल्या मस्त हिरव्या मिरची सोबत सर्व्ह करावे.

  5. 5

    धन्यवाद 🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anuja Pandit Jaybhaye
Anuja Pandit Jaybhaye @cook_19620906
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes