पोटॅटो भजी

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#goldenapron3 week 7 पोटॅटो
पोटॅटो पासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात. एकसे बढकर एक अशा चटकमटक पदार्थांची रांगच लागेल. त्यातील सर्वांचा अतीशय आवडीचा पदार्थ म्हणजे पोटॅटो भजी म्हणजेच बटाटा भजी. खमंग खुसखुशीत अशी बटाटा भाज्यांच्या वासानेच रसना जागृत होते. तर अशाच एका प्रकारच्या भजीची रेसिपी बघणार आहोत ‌

पोटॅटो भजी

#goldenapron3 week 7 पोटॅटो
पोटॅटो पासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात. एकसे बढकर एक अशा चटकमटक पदार्थांची रांगच लागेल. त्यातील सर्वांचा अतीशय आवडीचा पदार्थ म्हणजे पोटॅटो भजी म्हणजेच बटाटा भजी. खमंग खुसखुशीत अशी बटाटा भाज्यांच्या वासानेच रसना जागृत होते. तर अशाच एका प्रकारच्या भजीची रेसिपी बघणार आहोत ‌

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. मोठे बटाटे
  2. २ वाट्या बेसन पीठ
  3. १ चमचा तांदळाचे पीठ
  4. १ चमचा तिखट पूड
  5. पाव चमचा हळद
  6. अर्धा चमचा धणे-जिरे पूड
  7. १ चिमुटभर हिंग
  8. २ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
  9. १ वाटी तेल
  10. अर्धी वाटी पाणी
  11. पाव चमचा चाट मसाला
  12. लिंबाची फोड

कुकिंग सूचना

  1. 1

    बटाट्याची साले काढून त्याचे गोल काप करुन घ्या. ‌‌‌‌‌‌आणि ते काप एका बाऊल मधे पाणी घालून त्यात बुडवून ठेवावे. म्हणजे भजी तळेपर्यंत बटाट्याचे काप काळे पडत नाहीत.

  2. 2

    आता बेसनाचे बॅटर बनवण्यासाठी एका बाऊल मधे बेसन पीठ, तांदळाचे पीठ, तिखट पूड, हळद, मीठ, हिंग, धणे-जिरे पूड, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, १ चमचा कडकडीत तेल आणि पाणी घालून मिश्रण चांगले फेटून घ्यावे. कडकडीत तेल घातल्यामुळे भजी खुसखुशीत होतात. सोडा घालावा लागत नाही.

  3. 3

    पाण्यात ठेवलेले बटाट्याचे काप पाणी निथळवून एक एक करत बेसनाच्या बॅटरमधे बुडवून गरम तेलात तळून घ्यावे. आणि टिश्यू पेपरवर ठेवून अतिरिक्त तेल टिपून घ्यावे.

  4. 4

    गरमागरम खमंग खुसखुशीत पोटॅटो भजीवर चाट मसाला शिंपडून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून लिंबाची फोड ठेवून सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes