रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

  1. 12-15बदाम
  2. 12-15काजू
  3. 12-15पिस्ता
  4. 50 ग्रॅममगज बी
  5. 50 ग्रॅमभोपळा बी
  6. 2 टेबलस्पूनखसखस
  7. 2 टेबलस्पूनबडिशेप
  8. 1 टेबलस्पूनकाळीमिरी
  9. अर्धी वाटी ताज्या किंवा सुक्या गुलाबाच्या पाकळ्या
  10. 8-10हिरवी वेलची
  11. 1जायफळ
  12. 1 इंचदालचिनी तुकडा
  13. 3-4लवंग
  14. 1/2 चमचाकेशर
  15. 1 लिटरदूध
  16. 1वाटी साखर

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम सर्व साहित्य घेऊन त्यातील काजू बदाम पिस्ता मगज बी भोपळा बी खसखस बडीशेप आज काळीमिरी भिजेल एवढ्या पाण्यात ५-६ तास भिजत ठेवावे.

  2. 2

    मग बदाम आणि पिस्त्याची साल काढावी

  3. 3

    आता उरलेले सर्व सुके जिन्नस म्हणजे लवंग, दालचिनी वेलची, जायफळ, आणि गुलाब पाकळ्या थोडं केशर आज चिमूटभर साखर घालून बारीक करून घ्यावं मग भिजवलेले सर्व साहित्य बारीक वाटून घ्यावं. आणि त्यात आधी वाटलेली सुकी पूड एकत्र करावी.

  4. 4

    आता गॅस वॉर दूध मंद आचेवर तापत ठेवून सतत ढवळत राहावे आणि त्याला एक उकळी आल्यावर त्यात साखर उरलेलं केशर आणि ३-४ टेबलस्पून थंडाई पेस्ट घालून थोडं ढवळून गॅस बंद करावा.थोडं गर होऊ द्यावं

  5. 5

    मग ३-४ तास फ्रीझ मध्ये ठेऊन थंड झाल्यावर थंडगार थंडाई ग्लास मध्ये काढून त्यात केशरी रंगासाठी केशर काड्या, गुलाबाच्या पाकळ्या आणि हिरव्या रंगासाठी पिस्त्याचे काप घालजन सजवून सर्व्ह करावी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Shruti Desai Brown
Shruti Desai Brown @cook_20296834
रोजी

Similar Recipes