होममेड थंडाई

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

#होळी
#थंडाई
रंगपंचमीच्या दिवशी खास केली जाणारी थंडाई आज मी घरी बनविली. खुप आनंद झाला जेव्हा ती एकदम दुकानातून रेडिमेड आणतो तशीच चव आली आहे. तुम्हीही करून बघा....

होममेड थंडाई

#होळी
#थंडाई
रंगपंचमीच्या दिवशी खास केली जाणारी थंडाई आज मी घरी बनविली. खुप आनंद झाला जेव्हा ती एकदम दुकानातून रेडिमेड आणतो तशीच चव आली आहे. तुम्हीही करून बघा....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
१८-२०जण
  1. ३ टेबलस्पून बदाम (१/४ कप)
  2. १ टेबलस्पून काजू
  3. १ टेबल स्पून पिस्ता
  4. १ टेबल स्पून मगज
  5. १ टेबलस्पून मिरी
  6. १ टेबल स्पून खसखस
  7. १/२ टेबल स्पून बडीशेप
  8. चिमूट केशर
  9. २-३ टि स्पून गुलकंद
  10. १० हिरवी वेलची
  11. १" दालचिनी तुकडा
  12. ३०० ग्राम साखर
  13. ४५० मिली पाणी
  14. सजावटीसाठी गुलाब पाकळ्या

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    सर्व साहित्य जमा करा. बदाम सोडून सर्व साहित्य एकत्र करून पाणी घालुन ६ तास भिजत ठेवा.

  2. 2

    दुसऱ्या भांड्यात बदाम ६ तास भिजत ठेवा. ६ तासानंतर मिक्सरच्या भांड्यात बदाम सोललेले व भिजवलेले सर्व साहित्य पाण्यासहित घाला.

  3. 3

    मिक्सरमध्ये सर्व बारीक पेस्ट करा. त्यात गुलकंद घालून परत फिरवा.

  4. 4

    कढईत पाणी, साखर, केशर घालून साखर विरघळेपर्यंत शिजवा.

  5. 5

    नंतर वाटलेली पेस्ट घाला, सतत ढवळत रहा. मिश्रण थोडं दाट होत आलं की गॅस बंद करा आणि थंड झाल्यावर काचेच्या बाटलीत भरून ठेवा. हे सिरप २ महिने फ्रीझमध्ये ठेवल्यास छान टिकते (राहिले तर)

  6. 6

    सर्व्ह करताना भांड्यात १ मोठा चमचा थंडाई सिरप घेऊन त्यात २ कप थंड दूध, २-३ बर्फाचे तुकडे घालून एकातून दुसऱ्या भांड्यात ओता असे करून मग ग्लासात ओता.

  7. 7

    वरून सजावटीसाठी गुलाबाची पाकळी, केशर, पिस्त्याचे काप घालून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
रोजी
मुंबई

टिप्पण्या (3)

Similar Recipes