बीट रूट पनीर भुर्जी (Ironman Bhurji)

Gautami Patil0409
Gautami Patil0409 @cook_19582560
Mumbai

#goldenapron3
#beetroot
#IronmanBhurji
#healthy

बीट रूट तसे सहजासहजी पोटात जात नाही... पण बीटचा नैसर्गिक रंग कोणत्याही पदार्थाला वेगळा रंग बहाल करतो. ' रंग माझा वेगळा' म्हणणाऱ्या या बी भुर्जी ला Ironman भुर्जी असे नाव माझ्या मुलाने दिले आहे, आणि रंगामुळे... पण बीट हे लोह युक्त आहे, स्त्रियांनी आपल्या आरोग्य साठी हे अत्यंत आवश्यक आहे.

बीट रूट पनीर भुर्जी (Ironman Bhurji)

#goldenapron3
#beetroot
#IronmanBhurji
#healthy

बीट रूट तसे सहजासहजी पोटात जात नाही... पण बीटचा नैसर्गिक रंग कोणत्याही पदार्थाला वेगळा रंग बहाल करतो. ' रंग माझा वेगळा' म्हणणाऱ्या या बी भुर्जी ला Ironman भुर्जी असे नाव माझ्या मुलाने दिले आहे, आणि रंगामुळे... पण बीट हे लोह युक्त आहे, स्त्रियांनी आपल्या आरोग्य साठी हे अत्यंत आवश्यक आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

4 व्यक्तींसाठी
  1. 1मध्यम आकाराचा बीट रूट
  2. 1कांदा
  3. 200 ग्रॅमपनीर
  4. 2हिरव्या मिरच्या
  5. 5ते सहा कढीपत्त्याची पाने
  6. 1/4 टी स्पूनहळद
  7. 1/4 टी स्पूनहिंग
  8. 1/4 टी स्पूनमोहरी
  9. 1/4 टी स्पूनजिरे
  10. 1 टी स्पूनसाखर
  11. 2 टी स्पूनफ्रेश क्रीम
  12. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    प्राथमिक साहित्य अगदी मोजके आहे. बीट, पनीर, कांदा, मिरची व कढीपत्ता. बीट किसून घ्यावा, पनीर ही किसावे, कांदा बारीक चिरून घ्यावा. मिरच्या चिराव्या. तिखट आवडत असल्यास मिरची वाढवा... फ्रेश क्रीम ऐवजी रोजची दुधावरची साय उत्तम. चला तर मग पुढे जाऊया...

  2. 2

    एका कढई मध्ये तेल गरम करून घ्या. यात मोहरी जिरे हिंग यांची फोडणी करून घ्यावी. नंतर मिरची, कढीपत्ता घालून परतावे, नंतर कांदा घालून परतावे, यात हळद, मीठ साखर घालून पुन्हा छान परतून घ्यावे. कांदा नरम होईतोवर परतावा.

  3. 3

    कांद्यावर किसलेले पनीर घालून परतावे, सोबत स्टार ऑफ द विक मिस्टर बीट रूट यांना एकत्र करून परतून घ्यावे. छान एकजीव करावे व झाकण ठेवून एक वाफ काढावी.

  4. 4

    छान शिजले की यात मलई घालून पुन्हा एकदा परतून घ्यावे आणि गॅस बंद करावा. तयार बीट भुर्जी..... पोळी ची लज्जत वाढवण्यासाठी हातभार लावण्यासाठी सज्ज...

  5. 5

    अप्रतिम चव, बहारदार रंग.... बढिया बेत...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Gautami Patil0409
Gautami Patil0409 @cook_19582560
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes