कुरकुरीत ड्रमस्टिक (drumstick recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#रेसिपीबुक #week1
काल खूप वारा सुटला होता अणि पाऊस ही धोधो कोसळत होता भाजी घेतली तेव्हा शेवग्याच्या शेंगा घेतल्या.. घरात तसे त्या मला एकटीलाच आवडतात.. पण घरातल्या मंडळींना नावड्ती भाजी पण आवडिने खाऊ घालयला लावणे म्हणजेच गृहलक्ष्मी च्या पाक चातुर्यावरच अवलंबून असते..
हा पदार्थ मी झी मराठी च्या आम्ही सारे खवैय्ये महाराष्ट्राची रुचिरा मधे मैजिक बॉक्स थीम अंतर्गत केली होती.. आम्हाला वडा सांबर च साहित्य दिले पण ट्रेडिशनल डिश सोडून इनोवेटीव्ह बनवायचे होते.. त्यातली ही एक साइड डिश केली होती
चला तर आज परत एकदा तुमच्या साठी.... कुरकुरीत ड्रमस्टिक..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 3शेवग्यच्या शेंगा
  2. 3 टेबलस्पूनबेसन
  3. 1/2 टीस्पूनतिखट
  4. 1/2 टीस्पूनचाट मसाला
  5. 1/4 टीस्पूनहळद
  6. 1/2 टीस्पूनमीठ
  7. 1/2 टीस्पूनधणे जीरे पुड
  8. तळण्यासाठीतेल

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    प्रथम शेवग्या च्या शेंगा सोलून त्याचे दोन ते अडीच इन्चाचे तुकडे करुन पाण्यात दहा मिनिटे उकळून घ्या व थंड झालयावर मधून उभी चिर देऊन आतील बिया व गर काढुन घ्या. बेसन मधे शेंगा च्या काढलेल्या बिया व गर घाला सोबतच बाकी मसाले जसे तिखट मीठ धणे जीरे पुड हळद चाट मसाला घाला व किंचीत पाणी घालुन घट्ट पेस्ट करा.

  2. 2

    आत्ता तैय्यार केलेली बेसन पेस्ट फोटोत दाखवल्या प्रमाणे शेंगान मधे भरुन घ्या. असे सगळेच तैय्यार करुन घ्या. व थोडे बेसन अणि पाणी ची पातळ पेस्ट करा.

  3. 3

    भरुन तैय्यार केलेल्या शेंगा बेसन पाणी घोळात बडवून गरम तेलात खरपूस तळून घ्या व गरम गरम सर्व्ह करा.. ही शेंग ओरपून खाण्यातच मज्जा आहे..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Similar Recipes