चिंच  गुळाची चटणी व पुदिना चटणी/चाट चटण्या (chaat chutney recipe in marathi)

Shital shete
Shital shete @Shital_123
Pune

आपण घरी ओली भेळ पाणीपुरी सामोसा चाट असे चाट चे प्रकार बनवतो पण आपल्याकडे मार्केट मध्ये या पदार्थासोबत मिळतात तशा चटपटीत चटणी नसतात आणि मग या पदार्थाची मजा निघून जाते. आपण घरच्या घरी झटपट या चटपटीत चटणी बनवू शकतो आणि आपल्या चाट पदार्थांची मजा आणखी वाढवू शकतो. त्या साठी मी आंबट गोड चटपटीत चिंच गुळाची चटणी आणि तिखट पुदिना चटणी ची रेसिपी देते आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-25 मिनिटे
4 सर्व्हिंग्स
  1. चिंच गुळाची चटणी बनवण्यासाठी
  2. 1 कपचिंच
  3. 1 कपगूळ
  4. 1/4 टीस्पूनलाल मिरची पावडर
  5. 1/4 टी स्पूनचाट मसाला
  6. चवीनुसार मीठ
  7. पुदिना चटणी बनवण्यासाठी
  8. 1 कपपुदिन्याची पाने
  9. 1 कपकोथिंबीर
  10. 3-4 हिरव्या मिरच्या
  11. 7-8 लसून पाकळ्या
  12. 1 इंचआले
  13. 1/4 टीस्पूनसाखर
  14. 1/2 टीस्पूनलिंबूरस
  15. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

20-25 मिनिटे
  1. 1

    चिंचगुळाची आंबट-गोड चटणी बनवण्यासाठी चिंचेतील बिया काढून चिंचा स्वच्छ करून एका पाण्याने धुऊन घ्या व पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवा. भिजवलेले चिंचा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक पेस्ट करून घ्या.

  2. 2

    एका भांड्यावर गाळणी ठेवून हा चिंचेचा गर गाळून घ्या. गॅसवर पॅन गरम करून त्यामध्ये हा चिंचेचा गर घाला. त्यामध्ये एक कप किसलेला गूळ घालून गुळ वितळेपर्यंत शिजवून घ्या

  3. 3

    आता यामध्ये चवीनुसार मीठ लाल तिखट आणि चाट मसाला घाला ही चटणी घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्या. थंड करून बरणीमध्ये भरून ठेवून द्या.

  4. 4

    पुदिना चटणी बनवण्यासाठी पुदिना कोथिंबीर मिरच्या आले-लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्या.

  5. 5

    यामध्ये गरजेनुसार पाणी चवीनुसार मीठ पाव चमचा साखर अर्धा चमचा लिंबूरस घालून पुन्हा मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्या

  6. 6

    या चटण्या फ्रिज मध्ये साठवून ठेवू शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital shete
Shital shete @Shital_123
रोजी
Pune

टिप्पण्या

Similar Recipes