मैगी वेज रोज मोमोज (maggi momos recipe in marathi)

मैगी वेज रोज मोमोज (maggi momos recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम मैंदयात मीठ घालावे व त्यातील थोड्या मैंदया मध्ये थोडा लाल रंग घालून पीठ मळून घ्यावे व उरलेल्या मैंदयाला पण नीट मळुन घ्यावे.
- 2
नंतर एका पातेल्यात पाणी उकडून घ्यावे व त्यांत मैगी मसाला न घालता उकडून घ्यावी.मैगी उकडून झाली कि त्यांतील थोडी मैगी सर्व्हींग साठी काढून घ्यावी. व उरलेल्या मैगी मध्ये मैगी मसाला व पनीर, गाजर, कोबी व सीमला मिर्ची घालून २ मिनिटे मैगी शिजवून घ्यावी.
- 3
मैगी तयार झाली.
- 4
आता आपण जे लाल रंगाचे पीठ मळून घेतले आहेत त्यांची पातळ चपाती लाटून घ्यावी व पांढऱ्या रंगाच्या पीठाचा रोल करून ती लाल चपाती त्यांवर गुंडाळून घ्यावी व रोल तयार करून घ्यावा. नंतर त्या रोलचे छोट्या आकाराचे गोळे करून चपाती लाटून घ्यावे व लाटतांना तीन तीन च्या सेट मध्ये छोट्या मोठ्या आकाराच्या चपात्या लाटून घ्याव्यात नंतर तीन चपात्या एक वर एक थोडया थोडया अंतरावर ठेवुन
- 5
त्यांत मैगी भरून फोल्ड करुन घ्यावे व बोटाच्या साहाय्याने त्याचे रोज बनवुन घ्यावा व त्याला १० मिनिटे वाफवून घ्यावे.
- 6
तयार आहे आपले मैगी वेज मोमोज. आता तुम्हाला हवे तसे सर्व्हींग करून घ्यावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
व्हेज तंदुरी मोमोज (veg tandoori momos recipe marathi)
#मोमोज#सप्टेंबर मोमोज थीम आली & मी अशी विचारात ...हि रेसिपी आजपर्यंत कधी केली ही नाही , खाल्ली ही नाही. मग काय यु - ट्युब ची थोडी मदत घेतली .वाफवून मोमोज एवढे बरे नाही वाटले पण तंदुरी मोमोज ..यात सारण मात्र माझ्या पद्धतीने भरपूर भाज्या & पनीर वापरून केले .मॅरिनेट करण्याची पद्धत मात्र यु- ट्युब वर पाहिली. पहिल्यांदा केले पण..खुप छान झाले.Thanks cookpad...नवनवीन काहीतरी शिकण्यास मिळत आहे. Shubhangee Kumbhar -
सोया रोज मोमोज (soya rose momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोज हे मी पहिल्यांदा दिल्लीला खाल्ले. पण त्या आधी कधी बघितल सुद्धा नव्हत. आणि कधी बनवलं पण नाही. पण cookpad नी मोमोज बनवण्याची संधी दिली. आणि खरच मला हे रोज मोमोज बनवायला खूप मजा आली. Sandhya Chimurkar -
रोज मोमोज (rose momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरव्हॅलेंटाईनसाठी योग्य कृती. गुलाबाच्या शेपचे हे मोमोज खूप सुंदर दिसतात, मन मोहित करतात. मोमोज सोया सॉस किंवा मोमो सॉस किंवा आपल्या आवडीनुसार सॉस बरोबर खाऊ शकता. हर प्लाटर हीस शटर -
मोमोज (momos recipe in marathi)
#पूर्व भारत, उत्तर पूर्व राज्यमोमोज हे उत्तर पूर्व म्हणजे आसाम, अरुणाचल प्रदेश,सिक्कीम या प्रदेशातला उकडून केलेला नाश्त्यासाठी खायचा पदार्थ आहे. चीन, तिबेट भूतान इथला हा मुळ पदार्थ आहे. आता भारतात सर्वत्र हे मोमोज आवडीने खातात. माझ्या मुलीला हे खूप आवडतात म्हणून मी हे पहिल्यांदा केलेत. मस्त झालेत. Shama Mangale -
मेथी व्हेजी मोमोज (methi veg momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरआजचे मोमोज मी आपली आवडीची मेथीची भाजी घालून केलेत. खूप छान चवीला झालेत. Jyoti Kinkar -
मोमोज (momos recipe in marathi)
मोमोज # सप्टेंबर हा पदार्थ खरं तर आपलाच आहे पण आता तो आपण नव्याने शिकतोय.अनेक पत्रकारच सारण आणि डिझाईन मधे बनतात.काही ठिकाणी मंचावर सूप पण देतात ह्या बरोबर. Pradnya Patil Khadpekar -
-
व्हेज मोमोज
#स्ट्रीटस्ट्रीटफूड मधे बरेच वेगवेगळे पदार्थ खायला सगळ्यांनाच खूप आवडतात. त्यातील एक पदार्थ म्हणजे मोमोज. हा पदार्थ मला आणि माझा घरातील सगळ्यांनाच खूप आवडतो. या मोमोज मधे स्टीम मोमोज आणि फ्राईड मोमोज असे दोन प्रकार बघायला मिळतात. त्यातील स्टीम मोमोज आम्हाला खूपच आवडतात. याची रेसिपी मी इथे देत आहे. Ujwala Rangnekar -
-
कुरकुरे फ्राईड मोमोज विथ चटणी (momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर कुरकुरे फ्राईड मोमोज विथ चटणी ही रेसिपी शेअर करत आहे. मोमोज हा तिबेटियन पदार्थ असला तरी आता तो सगळीकडे आवडीने खाल्ला जातो. माझ्या मुलांनाही मोमोज खूप आवडतात पण आज मी थोडेसे वेगळे प्रकारचे मोमोज तुमच्याबरोबर शेअर करत आहे. स्टीम मोमोज आपण नेहमीच खातो पण हे कुरकुरे मोमोज खूपच टेस्टी आणि क्रिस्पी लागतात. त्याच बरोबर मोमोज चटणी ची रेसिपी पण मी शेअर करत आहे.मी नेहमीच काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत असते त्यामध्ये मी आता कॉर्न फ्लेक्सची पावडर करून त्याचे कोटिंग करून हे मोमोज बनवलेले आहेत तर तुम्हाला ही थोडी वेगळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा 🙏😘Dipali Kathare
-
चिकन मोमोज (chicken momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोज हा खूप प्रसिद्ध असा पदार्थ आहे. नेपाळ,सिक्कीम,हिमाचलप्रदेश,आणि दिल्लीकडे नॉर्थसाईड ला गेलात तर जागोजागी तुम्हाला मोमोज मिळतात.आपल्या इथे ही सर्वांना मोमोज खूप आवडतात. मोमोज मध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्या घालून किंवा चिकन खिमा घालून बनवू शकतो. मोमोज बनवताना तुम्हाला आपले मोदक नक्कीच आठवतील. फक्त आतल सारण वेगळं बाकी वळवण्याची, स्टीम करण्याची पद्धत सेम. मोमोज ला तुम्ही हवा तो आकार द्या. Trupti B. Raut -
-
हरीयाली मोमोज (hariyali momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरseptembersuperchefदोन प्रकारचे मोमोज ट्राय केलेय१ हरियाली पॉकेट मोमोज२ हरियाली फ्राईड मोमोज Tejal Jangjod -
शाकाहारी मोमोज (veg momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरपोस्ट १मोमोज हा पदार्थ शाकाहरी आणि मांसाहरी या दोन्ही गटात मोडतो, कारण मोमोजच्या आत जे सारण असते त्यात भाज्या घातल्या की हा शाकाहरी झाला आणि चिकण किंवा मटण खिमा करून घातले तर हे मांसाहरी मोमोज झालेत. मी मोमोज बनवण्याचा कधी प्रयत्न नव्हता केला. पण कूकपॅडच्या थीम मुळे आज संधी मिळाली मोमोज बनवण्याचा. खूप छान झाले एकदम चविष्ट. शाकाहारी मोमोजची रेसिपी मी शेअर करतेय. स्मिता जाधव -
व्हेज स्टीम मोमोज (veg steam momos recipe in marathi)
#मोमोज#सप्टेंबरव्हेज मोमोजमोमोज हा खूप प्रसिद्ध असा पदार्थ आहे.ही एक तिबेटीयन रेसिपी आहे. नेपाळ,सिक्कीम,हिमाचलप्रदेश,आणि दिल्लीकडे नॉर्थसाईड ला गेलात तर जागोजागी तुम्हाला मोमोज मिळतात.तिथे हे स्ट्रीटफूड म्हणून खूप फेमस आहे.आपल्या इथे ही सर्वांना मोमोज खूप आवडतात. मोमोज मधील भाज्या स्टीम केल्याने ही रेसिपी तेवढीच हेल्दी बनते.मोमोज बनवताना तुम्हाला आपले मोदक नक्कीच आठवतील. फक्त आतल सारण वेगळं बाकी वळवण्याची, स्टीम करण्याची पद्धत सेम. मोमोज ला तुम्ही हवा तो आकार द्या. वास्तविक तिबेटच्या मोमोज चवीबद्दल काही कल्पना नाही परंतु मी बनवलेल्या मोमोज ची चव अफलातून होती . Prajakta Patil -
पनीर मोमोज (paneer momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमी मोमोज जास्त केलेले नाहीत ही रेसिपी मला माझ्या ताईनी दिलेली आहे त्याप्रमाणे मी केली आहे. Rajashri Deodhar -
-
वेज मोमोज (momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरआज मी पहिल्यांदा मोमोज बनवले . खूप छान झालेत .माझ्या मूलांना आवडले म्हणजे छानच झाले Varsha Deshpande -
व्हेज मोमोज (veg momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर बाहेरच्या चमचमीत खाण्याची इतकी सवय झालेली, पण तोच पदार्थ, मोमोज घरी बनवायचा पहिलाच प्रयोग सक्सेसफुल झाला, घरच्यानाही खूप आवडला. Sushma Shendarkar -
बीट रोज मोमोज (beet rose momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरखरे तर रोज मी कधीही बनवले नाही परंतु माझ्या मुलीला खूप आवडतात. ती खूप छान बनवते मी तिलाच विचारली रेसिपी व थोडं माझं पण डोकं लावलं. हे इतके हेल्दी इतके पोस्टीक व तितकीच आकर्षक मोमोज जन्माला आले. घरी घरी घरी आलेल्या पाहुण्यांना दिल्यावर लाजवाब हाच एक शब्द त्यांच्या तोंडून निघाला. Rohini Deshkar -
-
स्विट मोमोज (sweet momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरगोड पदार्थ लहानपणापासून मोठ्या पर्यंत सर्वांना आवडतात कोणताही पदार्थ जर आकर्षक असेल तर पाहताच क्षणी खावेसे वाटतात, म्हणून एक छोटासा प्रयत्न केला तुमच्या आहे स्विट मोमोज सर्वाना आवडेल असे. Trimbake vaishali -
पौष्टिक मोमोज (healthy momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोज चे व्हेज मोमोज ,चिकन मोमोज, सोया मोमोज, तंदुरी मोमोज, पनीर मोमोज, चोकलेट मोमोज आसे आनेक प्रकार आहेत. मी सारणासाठी कडधान्ये , भाज्या , चीज वापरले आहे आणि मैद्याच्या ऐवजी गव्हाच्या पीठाचा वापर करून मोमोज बनवले आहेत. Ranjana Balaji mali -
वेज कीमा तंदुरी मोमोज (veg kheema tandoori momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर तंदुरी मोमोज म्हटलं की अगदी तोंडाला पाणी सुटतं तसे तंदुरी मोमोज तळून करतात पण मी पहिल्यांदाच येथे प्रयोग केला आणि स्टीम केलेले वाफवलेले मोजला मॅरीनेट करून आणि मग भाजून घेतलं आणि अगदी तंदुरी फ्राय लागते तुम्ही पण करून पहा असे हे हेल्दी मोमोज व्हेजिटेरियन असल्यामुळे केव्हाही करता येतात R.s. Ashwini -
ऑल इन वन व्हेजिटेबल मोमोज (vegetable momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरऑल इन वन व्हेजिटेबल मोमोज मोमोज सर्वांच्याच आवडीचे .. गरमागरम स्टीम्ड मोमोज ची मज्जा काही वेगळीच नाही का? पण मी आज हे गव्हाच्या पीठ वापरून आणि भरपूर भाज्या घालून केलाय. खूप मस्त आणि जे लहान मुलं भाज्यांना कंटाळा करतात त्याच्याकरिता तर एकदम मस्त पर्याय आहे . Monal Bhoyar -
मोमोज विथ व्हाइट साॅस (momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमो हा माझा आवडता पदार्थ आहे. या थीम मुळे मला फार आनंद झाला कारण मोमो फक्त घरात मलाच आवडतात. पण आज जरा वेगळेच घडले व्हइट साॅस बरोबर मोमो ची चव व्दीगूनीत झाली आणि घरात मोमोजला खुपच मागणी आली. Jyoti Chandratre -
-
पिझ्झा मोमोज (pizza momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर तसं बघायला गेले तर मोमोज हा पदार्थ आपण मोदक करतो जवळपास तसाच आहे.. मोदक गोड असतात आणि मोमोज तिखट..आज मी गव्हाचं पीठ आणि सर्व भाज्या वापरून हेल्दी आणि पौष्टिक असे मोमोज बनवले आहेत. पिझ्झा स्टफिंग असल्यामुळे पिझ्झा मोमोज खूप अप्रतिम लागतात. Ashwinii Raut -
व्हेज मोमोज आणि फ्राईड मोमोज (momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर2018 साली नेपाल tour झाल्यावर मोमोज हा प्रकार खूप वेळा घरी आल्यावर वेगवेगळ्या स्टफिंग करून बनवले आहे. कधी मॅश केलेली बटाटा भाजी तर कधी मॅश बटाटे, गाजर, मटार, चीज यांचं मिश्रण एकत्र मिक्स करून स्टफिंग केले. आज मी इथे माझे सगळे मोमोज वाफवून झाल्यावर त्यातलीच तीन मोमोज घेऊन dipali kathare यांची फ्राईड मोमोज ची रेसिपी recreated केली. मी कोटिंग साठी भाजलेले बारीक रवा घेतले. प्रथमच असे कुरकुरीत आणि टेस्टी मोमोज घरच्यांना ही खूप आवडले. थँक यू दिपालीजी फ्राईड मोमोज या थोडी वेगळी रेसिपी साठी. Pranjal Kotkar
More Recipes
टिप्पण्या (8)