ऑरेंज खवा बर्फी (orange khava barfi recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#रेसिपीबुक #week14
#अळूवडी आणी बर्फी
ऑरेंज म्हटले की नागपूर ची आठवण येतेच,संपूर्ण जगात नागपूरी संञा प्रसिद्ध आहेत.आंबट,गोड चव असणाऱ्या या संञ्याप्रमाणेच नागपूरी संस्कृती मधाळ व गोड आहे.पश्चिम विदर्भ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर चे संञ्यांपासून बरेच पदार्थ प्रसिद्ध आहेत.
त्यातच खास फक्त नागपूरची संञा बर्फी म्हटली की लगेच तोंडाला पाणी येते व कोणताही ऋतू असो संञा खाण्याची ईच्छा जागृत होते.बर्फी हा शब्दच मुळात गोड व मधुरता आणतो.मुळचा पर्शियन असलेला बर्फ या शब्दापासून तयार झालेला बर्फी शब्द आज मिठाई प्रकारात अगदी उच्च स्थान ग्रहण करून आहे.
वर्षातील काही महिनेच उपलब्ध असणारे हे ऑरेंजेस ईतर महिन्यात मिळतच नाहीत म्हणून काय आपली संञा बर्फी खाण्याची हौस पुर्ण करायची नाही का?? तर आता तसे होणार नाही कारण मी खास आपल्यासाठी कोणत्याही ऋतूत करता येणारी व अस्सल नागपूरी संञ्यांचीच चव असणारी ऑरेंज बर्फी कशी बनवायची याची रेसिपी सांगणार आहे.तर मग चला तय्यार व्हा रसाळ व मधाळ ऑरेंज बर्फी चाखायला.
......

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
12 नग
  1. 125 ग्रॅममावा
  2. 125 ग्रॅमऑरेंज क्रश
  3. 50 ग्रॅमसाखर
  4. 50 ग्रॅमनारळाचा चुरा
  5. 2चिमटी ऑरेंज रंग
  6. 1/2 टीस्पूनवेलची पूड
  7. 2 टेबलस्पून पिस्ता काप सजावटी साठी
  8. 1पार्चमेंट पेपर
  9. 1/4 टीस्पूनतुप

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम पसरट कढईत खवा भाजुन घ्या व त्यात साखर घाला व चांगले परता.

  2. 2

    आत्ता त्याचा गोळा व्हायला सुरवात होईल तर त्या मधे ऑरेंज क्रश घाला व मिक्स करा आता त्यात खोबरा कीस, ऑरेंज रंग, वेलची पुड, घालुन छान एकजीव करा.

  3. 3

    आता ह्या मिश्रणा ला सतत हलवत राहा जेव्हा मिश्रण कडा सोडायला लागेल तेव्हा गैस बन्द करा व एका आयतकृती भांड किंवा थाळी ला तुप लावुन पर्च्मेंट पेपर लव व त्या वर पिस्ता व थोडा खोबरा किस घाला व ऑरेंज खवा मिश्रण त्यावर पसरवा व थंड होण्यास ठेवा.

  4. 4

    थंड झाले की चाकुनी कडा सोडून घ्या व प्लेट मधे उल्थवून घ्या. पार्चमेंट पेपर काढुन घ्या. व त्याच्या वड्या पाडून आल्या गेल्यान्चे तोंड गोड करा.. माझ्या ह्या ऑरेंज खवा बर्फी नी...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

Similar Recipes