अळूवडी (aluvadi recipe in marathi)

Shital shete
Shital shete @Shital_123
Pune

#रेसिपीबुक #week14 अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणून अळूवडीची ओळख आहे . जितकी ती महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे तितकीच गुजरात मध्ये पात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. अळूची पाने विशेतः पावसाळ्यात छान मिळतात आणि पावसाळी थंड वातावरणात ही कुरकुरीत खमंग अळूवडी ची मजा काही औरच

अळूवडी (aluvadi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week14 अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणून अळूवडीची ओळख आहे . जितकी ती महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे तितकीच गुजरात मध्ये पात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. अळूची पाने विशेतः पावसाळ्यात छान मिळतात आणि पावसाळी थंड वातावरणात ही कुरकुरीत खमंग अळूवडी ची मजा काही औरच

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

35-40 मिनिटे
4 सर्व्हिंग्स
  1. 7-8अळूची पाने
  2. 1 1/2 कपबेसन पीठ
  3. 1 टीस्पूनहळद
  4. 1 टीस्पूनलाल मिरची पावडर
  5. 1 टीस्पूनजिरे पावडर
  6. 1 टीस्पूनओवा
  7. 1 टीस्पूनपांढरे तीळ
  8. 1 टेबलस्पूनहिरवी मिरची लसूण ठेचा
  9. 1 टेबलस्पूनचिंच गुळाचा कोळ
  10. चवीनुसार मीठ
  11. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

35-40 मिनिटे
  1. 1

    अळूची पाने स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घ्या. त्याचा देठ आणि मागच्या शिरा काढून त्यावर लाटण फिरवून घ्या. म्हणजे त्याचा घट्ट रोल बनवता येईल.

  2. 2

    एका भांड्यात बेसन पीठ घ्या, त्यात हळद, लाल मिरची पावडर, जिरे पावडर घाला.

  3. 3

    चवीनुसार मीठ, ओवा पांढरे तीळ हिरवी मिरची चा ठेचा, चिंच गुळाचा कोळ घाला.

  4. 4

    थोडे पाणी घालून घट्टसर पीठ भिजवून घ्या. आता एक पान उलटे ठेवून त्यावर पीठ लावून घ्या, त्यावर दुसरे पान ठेवून त्यावर पीठ लावून या पानांचा घट्ट रोल बनवून घ्या

  5. 5

    एक चाळणीला तेल लावून त्यावर हे रोल ठेवा. एका पातेल्यात पाणी गरम करून त्यावर ही चाळणी ठेवून झाकण ठेवून हे रोल १० ते १५ मिनिटे वाफवून घ्या. वाफवलेले रोल थंड करून त्याच्या अर्ध्या इंचाच्या वड्या कापून घ्या.

  6. 6

    कढईमध्ये तेल गरम करून या वड्या दोन्ही बाजूने खरपूस सोनेरी रंगावर तळून घ्या. आळुच्या कुरकुरीत आणि खमंग वड्या तयार आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital shete
Shital shete @Shital_123
रोजी
Pune

टिप्पण्या

Similar Recipes