मिक्स पिठाची पौष्टिक अळूवडी (aluvadi recipe in marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#रेसिपीबुक #week14
#मिक्स पिठाची पौष्टिक अळू वडी
अळू वडी हा एक पारंपरिक प्रकार आहे यात मी थोडा नाविन्यता आणुन पौष्टिक वकुरकूरीत अशी अळू वडी बनवली आहे.
आमच्या कडे जनता कर्फ्यू मुळे मला अळूची पाने मिळत नव्हती. माझ्या एका मैत्रिणीला मी बोलले तिने लगेचच तिच्या कुंडितील अळूची पाने काढून दिली मी तिला आधी धन्यवाद देते. कारण मी ही थीम तीच्यामूळे पुर्ण करू शकले.
हा पदार्थ पुर्वापार आपण करत आलो आहे.यात पाने वापरताना वडी लहान व कोवळी पाने तर भाजी साठी मोठी पाने वापरावी. आणि नेहमी दोघं प्रकार करताना चिंच कोळ वापरावा म्हणजे घशाला खाजरे येत नाही.आमच्या गावी (महाराष्ट्रात काही भागात नंदूरबार ,शहादा, दोंडायच्या इकडे चिंचेच्या चटणी बरोबर सर्व्ह करतात.)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिट
7-8 सर्विंग
  1. 4 टेबलस्पूनबेसन पिठ
  2. 2 टेबलस्पूनबाजरीचे पिठ
  3. 2 टेबलस्पूनतांदुळाचे पीठ
  4. 8अळूची कोवळी पाने
  5. 1 टीस्पूनजिरे धने पावडर
  6. 1 आणि 1/2 टीस्पूनलाल मिरची पावडर
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. 1 आणि 1/4 टीस्पूनमीठ
  9. 1 टेबलस्पूनचिंचेचा कोळ
  10. 1 टेबलस्पूनगूळ
  11. 1/4 टीस्पूनहिंग
  12. 7-8 लसूण कळ्या
  13. 3/4आले तुकडा
  14. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

45 मिनिट
  1. 1

    बेसन पिठ,बाजरीचे पिठ,तांदुळ पीठ घेऊन एकत्र करून घ्या. त्यात तिखट,मिठ,,लसूण व आले पेस्ट करून घाला,हळद,धने जिरे पावडर,हळद,गुळ,हिंग,चिंचेचा कोळ घाला.

  2. 2

    पाणी घालून गोळा शेवे साठी भिजवतो तसे पिठ भिजवून घ्यावे. फार पातळ ही नाही आणि फार घट्ट ही नाहीं. पानं स्वच्छ करून ते धुवुन त्या मागील शीरा वदेठ काढून घ्या म्हणजे रोल करताना पटकन न तुटता वळला जातो.पान ठेवून त्यावर मिश्रणाचा गोळा लावून घ्या.

  3. 3

    आता त्यावर दुसरे पान फक्त उलट दिशेने ठेवून पिठ लावून घ्या. असेच अजून दोन पान ठेवून पीठ लावून घ्या. व रोल वळून घ्या.

  4. 4

    असाच दुसरा चार पानांचा रोल करून घ्या. स्टिमर मध्ये दिड ग्लास पाणी घालून झाकण लावून पाणी उकळायला ठेवा वाफ निघायला लागली की रोल स्टिमर मधील जाळीवर ठेवा बारा ते पंधरा मिनिट वाफवून घ्या.वाफवून (मिडीयम लो फ्लेमवर) झाले कि पाच ते दहा मिनिट थंड करून घ्या. वड्या कट करून घ्या.

  5. 5

    आता तेल तळण्यासाठी गरम करा. वड्या तेलात खरपूस तळून काढा. चिंचेच्या चटणी बरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes