काजू गुलाब बर्फी (kaju gulab barfi recipe in marathi)

Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
Kalyan

#रेसिपीबुक #week14

आळूवडीआणिबर्फीरेसिपीज

दीवाळी असो की घरात कोणताही शुभ प्रसंगी गोडाचे मिष्टान्न व बर्फी ही केलीच पाहिजे त्या शिवाय सण साजरा होऊ शकत नाही.
अगदी लहानांना पासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी काजू कतली शिवाय तर जणू दीवाळी साजरी होत नाही.मग विचार केला ह्याच काजू कतली ला गुलाबाच्या फुलांच्या रुपात तयार करुन अघीक मोहक तयार करता येईल.

गुलाबाच्या रुपातील ही काजू कतली मी नेहमी रुखवत,दीवाळी, भाऊबीज, रक्षाबंधन प्रसंगी किंवा कोणा कडे भेटायला जातानाही मिठाई म्हणून करून घेऊन जाते. तुम्हाला ही असे करता येईल ज्याने तुम्हाला देखील ताजी व घरी बनविलेल्या चे अधीक समाधान मिळेल व समोरील व्यक्ती पण नक्की च खूष, शिवाय बाजारातील महाग व डुप्लीकेट मिठाई पेक्षा चांगली घरीची काजू गुलाब बर्फी म्हणजे "देखते ही मुंह मे पानी आना " आहा!!!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

६० मिनिटे
१२ गुलाबाची फुल
  1. 1 कपकाजू
  2. 1 कपमिल्क पावडर
  3. 1/2 कपसाखर
  4. 1 टेबलस्पूनतूप
  5. 1/3 कपपाणी
  6. 1 टेबलस्पूनवेलची पावडर
  7. आवडी प्रमाणे रंग
  8. 1 थेंब पिवळा रंग
  9. 1 थेंब गुलाबी रंग
  10. 1 थेंब हिरवा रंग

कुकिंग सूचना

६० मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम सांगीतल्या प्रमाणे सर्व साहित्य काढून घ्यावे.

  2. 2

    मिक्सर च्या भांड्यात काजू घालून.मिक्सर थोड्या वेळ चालू व बंद असे करुन काजू ची बारीक पावडर करून घ्यावी.(काजू फ्रिजला ३-४ तास ठेवून मग त्याची मिक्सर ला पावडर करावी.)

  3. 3

    एका नॉनस्टिक पॅनमध्ये साखर व पाणी घालून त्याचा एकतारी पाक तयार करावा

  4. 4

    पाक तयार झाला की त्यात तूप घालावे व थोडे थोडे करुन काजू पावडर आणि मिल्क पावडर घालावी व व्यवस्थित पाकात मिक्स करावे.(काजू पावडर व मिल्क पावडर सगळी एकदम घातली तर त्याच्या गुठळ्या होतील म्हणून थोड्या थोड्या बॅच ने टाकावी)

  5. 5

    सर्व मिश्रण सतत ढवळत राहावे नाहीतर खाली चिकटते. आता त्यात वेलची पावडर घालावी.मिश्रण थोडे घट्ट झाले की एका प्लॅट ला तूपाचा हात लावून त्यात तयार मिश्रण काढून घ्या.

  6. 6

    आता तयार मिश्रणाचे तीन भाग करून त्यात आवडीप्रमाणे रंग घालून रंग व्यवस्थित मिक्स करून घ्या.

  7. 7

    मिश्रण थोडे थंड झाल्यावर त्याचा गोळा तयार होईल.आता पोलपाटावर जाड प्लास्टीक ठेवून त्याला व लाटण्याला तूपाचा हात लावून घ्या.(म्हणजे मिश्रण चिकटणार नाही).मी इथे सिलिकॉन मॅट चा वापर केला आहे.त्या वर तयार मिश्रणाची पोळी लाटून घ्या व छोट्या कटर किंवा झाकणाच्या सहाय्याने छोटे गोल कापून घ्या.

  8. 8

    गुलाबाचे फुल तयार करण्यासाठी प्रथम एक गोल घेऊन त्याची फोटो दाखवलेल्या प्रमाणे कळी तयार करावी.मग कळी च्या दोन बाजू ला दोन पाकळ्या जोडाव्या व खालून थोड्या दाबून आपल्या ला हवे तसे एक एक पाकळी जोडावी व गुलाबाचे फुल पाच पाकळ्या चे तयार करावे.

  9. 9

    ह्या प्रमाणे सर्व गुलाबाची फुले व पाने तयार करुन घ्यावीत.

  10. 10

    कोणत्याही सणावारी किंवा दिवाळीला कोणाकडे जाताना,रुखवतात आपण काहीतरी गोडाचा पदार्थ घेऊन जातो त्या साठी दुकानातून महागाई ची व डुप्लीकेट मिठाई घेण्यापेक्षा घरी केलेली ही गुलाबाची फुले पाहून समोरची व्यक्ती पण नक्कीच खूप खूष होईल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
रोजी
Kalyan

Similar Recipes