कोकोनट कॉफ़ी नानखटाई (coconut nankhati recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#नानखटाई#सप्टेंबर
लहानपणी आईला नानखटाई बनव्तांना पाहिले होते ती पराती मधे तुप फेटायची खूप वेळ लागायचा ते पाहुन मला वाटायचे नानखटाई म्हणजे खूप किचकट काम. मग मी मोठी झाले तेव्हा आई बाहेरुन करुन घेत होती. मी कधी नानखटाई च्या भानगडीत पडलेच नाही. आमच्या अमरावती ला पालेकर ची नानखटाई प्रसिध्द मग काय तिच घरात येऊ लागली. माझी कीट्टी मधली मैत्रीण तर हा हा म्हणता नानखटाई करायची. मला तिचे खूप अप्रुप वाताय्चे पण तरी मी नानखटाई करायची काही हिम्मत केली नाही. ज्या गोष्टी पासुन आपण पाळतो ती गोष्ट तुमच्या समोर कधी ना कधी येते हे cookpad नी सिद्ध केले.. नानखटाई बनवायला सांगितली आणी मी ती चक्क बनवली पण जेव्हा नानखटाई करायला घेतली तर बस तिस मिनिट मधे अप्रतीम खुसखुशीत आणी स्वादिष्ट अशी नानखटाई झाली पण...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
10 नग
  1. 50 ग्रॅमसाजुक तूप
  2. 50 ग्रॅमपिठी साखर
  3. 50 ग्रॅमखोबरा किस
  4. 75 ग्रॅमकणिक
  5. 1 टीस्पूनकॉफ़ी
  6. 1 टीस्पूनविलायची पावडर
  7. 1 टीस्पूनदुध
  8. सजावटीसाठी पिस्ता व खोबरा किस

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    प्रथम सर्व सामग्री एका ठिकाणी आणुन घ्यावी. इथे मी कॉफ़ी बीन्स भाजुन मिक्सर मधून बारिक काढुन घेतले. तुप व पिठी साखर छान बिटर नी दहा मिनिट हलके होई पर्यंत फेटून घ्या म्हणजे बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा च वापर टाळता येतो. आत्ता त्या मधे कॉफ़ी व विलायची पावडर घालुन फेटा.

  2. 2

    आता ह्या तुपाच्या मिश्रणात कणिक व खोबरा कीस घालुन मळुन घ्या.

  3. 3

    मळुन झालेला गोळा असा दिसतो(फोटो मधिल प्रमाणे)एकिकडे बेकिंग ट्रे ला तुप व बटर पेपर लावुन तैय्यार ठेवा (कढईत करत असाल तर प्लेट ला तुप लावुन असेच करु शकता) आत्ता ह्या मळलेल्या गोळ्याचे छोटे छोटे गोळे करा व हलकेच दाबुन किंचीत चपटे करा.

  4. 4

    आशे सगळे तुम्हाला हवे असलेले आकारात करुन घ्या. आत्ता ह्या नानखटाई ला थोडे दुध ब्रश नी लावा व त्यावर खोबरा कीस व पिस्ता चे काप चिकटवा(हलकेच दाबले तरी चालेल)

  5. 5

    आत्ता हा बेकिंग ट्रे माइक्रोवेव ला ओवेन मोड 200 डिग्री तापमान वर चौदा ते सतरा मिनिट ठेवा. व नंतर काढुन कूलिंग रैक वर थंड करुन घ्या.(कढई आधी दहा मिनिट साथी गरम करुन घ्या व त्या मधे स्टैंड ठेऊन नानखटाई ची प्लेट ठेवा व झाकुन पंधरा मिनिट बेक करुन घ्या)

  6. 6

    आत्ता ह्या थंड केलेल्या नानखटाई बन्द डब्यात भरून ठेऊ शकता व जेव्हा सर्व्ह कराल तेव्हा नानखटाई व गरम गरम वाफाळलेला चहा.... वह्ह्ह क्या बात है

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

Similar Recipes