पुरणपोळी (puran poli recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#पश्चिम#महाराष्ट्र
#पुरणपोळी म्हणजे आमच्या घरात आवडीचा गोड पदार्थ ,माझ्या मुलांचा तर फार .तसे महाराष्ट्रीयन लोकांच्या सर्व देवी देवताच्या नैवेद्यात तिचे अन्यन्य साधारण महत्व.आज संकष्टी मग काही तरी नैवेद्य हवा मग आज बाप्पा साठी पुरणपोळी केली.

पुरणपोळी (puran poli recipe in marathi)

#पश्चिम#महाराष्ट्र
#पुरणपोळी म्हणजे आमच्या घरात आवडीचा गोड पदार्थ ,माझ्या मुलांचा तर फार .तसे महाराष्ट्रीयन लोकांच्या सर्व देवी देवताच्या नैवेद्यात तिचे अन्यन्य साधारण महत्व.आज संकष्टी मग काही तरी नैवेद्य हवा मग आज बाप्पा साठी पुरणपोळी केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

2 तास
6/8 सर्व्हिंग्ज
  1. 500 ग्रॅमचण्याची डाळ
  2. 500 ग्रॅममैदा
  3. 60मिली तेल
  4. 120मिली पाणी पीठ भिजवण्यासाठी
  5. 1/2 टीस्पूनमीठ
  6. 100-150 ग्रॅमसाजूक तूप
  7. 500 ग्रॅमगुळ
  8. 3 टीस्पूनसाखर
  9. 1 टीस्पूनवेलची पावडर
  10. 1 टीस्पूनजायफळ पावडर

कुकिंग सूचना

2 तास
  1. 1

    चण्याची डाळ स्वच्छ धुवून 3/4 तास भिजत घालावी,साधारण तिप्पट पाणी घालून शिजत ठेवणे किंवा कुकरला शिजवून घेणे (4शिट्या).मी नेहमीच बाहेर शिजवते.

  2. 2

    डाळ शिजत तोवर गुळ चिरून घेणे व डाळ शिजली कि पाणी असेल तर आटवणे नंतर गुळ, साखर घालावी व चांगले आटवावे.व पुरण पुरणयंत्रा तून करून घ्यावे.पुरणामधे वेलची पुड जायफळ पुड घालून मिक्स करावे.

  3. 3

    डाळ शिजत असते तेव्हा मैदा मळून घ्यावा.मैद्या मधे 1/2 टीस्पून मीठ घालावे व 60मिलीतेल घालून चोळून घेणे 120 मिलीमीटर पाणी हळूहळू मैद्यात घालून मैदा सैलसर भिजवून झाकून ठेवणे.(अडीच कप मैद्यासाठी अर्धा कप तेल नि एक कप पाणी लागत

  4. 4

    ह्या पुरणामधे साधारण 30/35 पुरणपोळ्या होतात तेव्हढे पुरणाचे गोळे करणे

  5. 5

    साधारण पुरणाच्या निम्मे पिठ घ्यावे व त्यात पुरण घालून गोळे करावे एका वेळी चार पाच करावे.तवा गॅसवर तापत ठेवावा व एक एक पोळ्या एकदम पातळ लाटाव्यात.

  6. 6

    पोळीपोळी भाजताना एकदा उलट केली कि मी तव्यावर वर खाली तुप लावते ही माझी पध्दत आहे तुम्ही तूप तव्यावर न लावता पण पोळ्या भाजू शकता.मऊसूत पोळ्या तयार झाल्या आहेत दुधाबरोबर,तुपा बरोबर खायला द्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes