पुरणपोळी

दिपाली महामुनी
दिपाली महामुनी @cook_26219866

#पश्चिम #महाराष्ट्र
पुरणपोळी म्हणजे महाराष्ट्र लोकांचे पंच पक्वान्न असल्या सारखे जेवण. बहुतेक प्रत्येक सणाला पुरणपोळी हवीच. मग होळी असो नाहीतर पाडवा असो, नाहीतर गौरी गणपती असो. सगळ्यात स्पेशल मेनू

पुरणपोळी

#पश्चिम #महाराष्ट्र
पुरणपोळी म्हणजे महाराष्ट्र लोकांचे पंच पक्वान्न असल्या सारखे जेवण. बहुतेक प्रत्येक सणाला पुरणपोळी हवीच. मग होळी असो नाहीतर पाडवा असो, नाहीतर गौरी गणपती असो. सगळ्यात स्पेशल मेनू

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1तास
5लोक
  1. 500 ग्रॅमहरभरा डाळ
  2. 600 ग्रॅमसेंद्रिय गूळ
  3. 5-6वेलदोडा
  4. 1/2 छोटा चमचाजायफळ किसून
  5. 1/2 टीस्पूनहळद
  6. 1 वाटीतेल
  7. 5 वाटीगव्हाचे पीठ
  8. 3 टीस्पूनमैदा
  9. 3 टीस्पूनतांदळाचे पीठ

कुकिंग सूचना

1तास
  1. 1

    प्रथम गव्हाचे पीठ, मैदा, मीठ, थोडे तेल टाकून पीठ मळून घेणे. तेल लावून झाकून ठेवणे.

  2. 2

    आता गॅसवर मोठे पातेले पाणी टाकून ठेवा. त्याला उकळी आली कि मग त्यात हरभरा डाळ टाकणे साधारण पाणी 4तांबे तरी असावे. त्यात हळद व थोडे तेल टाकावे त्यामुळे पुरणाला रंग छान येतो आणि डाळ लवकर शिजते

  3. 3

    शिजल्यानंतर डाळ चाळणीत खाली पातेले ठेऊन निथळावी

  4. 4

    परत नंतर शिवलेल्या पातेल्यातच ती डाळ टाकावी आणि त्यात गूळ टाकून छान सुकेपर्यंत परतणे.

  5. 5

    नंतर पुरणाच्या चाळणीत टाकून ग्लास ने पुरण वाटावे.

  6. 6

    त्यात वेलची आणि जायफळ पूड घालावी. आता पोळ्या करायला घेऊया. मळलेली कणिक परत छान तिंबून घ्यावी. आता लिंबाएवढा पिठाचा गोळा घ्या तो पिठाचा हात लावून खोलगट करावा नंतर त्यात पिठाच्या गोळ्यांपेक्षा पुरण डबल घ्या त्यात भरा आता उंडा तयार करा. हाताने एकसारखा गोल फिरवा

  7. 7

    आणि मस्त तांदळाच्या पिठावर लाटावी आणि खरपूस तव्यावर भाजावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
दिपाली महामुनी
रोजी

Similar Recipes