पुरणपोळी (puran poli recipe in marathi)

Sanskruti Gaonkar
Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
Mumbai

#hr
होळी हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो.
होळी या उत्सवाला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिकादहन, शिमगा, धुळवड,होळी पौर्णिमा, धूलिवंदन व रंगपंचमी अशी विविध नावे आहेत.
होळी म्हणजे आनंद, उत्साह, चैतन्य… मुक्त रंगांची उधळण. महाराष्ट्रात सर्वत्र होळी साजरी केली जाते पण कोकणातील होळीचे वैशिष्ट्य, उत्साह, परंपरा काही औरचं.! 
आमच्या कोकणात होळीचा उत्सव अतिशय मोठा मानला जातो. होळीच्या निमित्ताने ग्रामदेवतेची पालखी प्रत्येक गावागावामध्ये फिरताना ग्रामदेवतेला गाऱ्हाणे घालून आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी साकडे घातले जाते.
पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो.
चला तर मग मऊ लुसलुशीत पुरणपोळीची रेसिपी बघूया.😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
5-6 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 किलोमैदा
  2. 2 कपचना डाळ
  3. 2 कपगूळ
  4. 1/2 टीस्पूनहळद
  5. 1 टीस्पूनवेलची पावडर
  6. 1 टीस्पूनजायफळ
  7. 1 कपतूप
  8. 2 टीस्पूनतेल
  9. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    छान डाळ स्वच्छ धुवून 5-6 तास पाण्यात भिजत ठेवा. पीठ नीट चाळून घ्या. मग त्यात चवीनुसार मीठ थोडी हळद टाकून मिक्स करून थोडे थोडे पाणी घालून नरम मळून घ्या. तेल लावून पुन्हा छान मळा. झाकण ठेऊन गोळा 2 तास बाजूला ठेवा. डाळीतले पाणी गाळून घ्यावे आणि एका भांड्यात ते भांडे अर्धे भरेल एवढे पाणी ठेवा त्याला उकळी अली की डाळ टाकून शिजवून घ्या.

  2. 2

    डाळ पूर्ण शिजल्यावर त्यातले पाणी पुर्णपणे निथळून घ्यावे. त्यात किसलेला गूळ घाला आणि चमच्याने डाळ सुकी होईपर्यंत ढवळत राहा. नंतर त्यात वेलची आणि जायफळ पावडर टाकून मिक्स करून गॅस बंद करा. गरम असतानाच डाळ स्टीलच्या चाळणीवर किंवा पुरणयंत्रातून वाटून घ्या. आता पिठाचे छोटे छोटे गोळे करून त्यात पुरण भरा आणि पोळी लाटून घ्या.

  3. 3

    तवा गरम करून त्यावर पोळी टाका दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्या.वरून तूप लावा आणि गरमागरम कटाच्या आमटीसोबत सर्व्ह करा.☺☺

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sanskruti Gaonkar
Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
रोजी
Mumbai
I love cooking.... it's one of my favorite hobby....I m passionate about cooking.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes