विदर्भ स्पेशल मसालेदार अंडाकरी (anda curry recipe in marathi)

विदर्भ स्पेशल मसालेदार अंडाकरी (anda curry recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम अंडी उकळून घ्यावी. उकळून झाल्यावर त्याची साल काढून एका कढईमध्ये तेलात ती फ्राय करून घ्यावी. त्यानंतर त्या अंड्यांचे समसमान भाग करून घ्यावे. त्या काप केलेल्या अंड्यांवर थोडे तिखट, मीठ, जिरे पावडर, धने पावडर व सांबार टाकून गार्निशिंग करावे.
- 2
आता एका कढईमध्ये थोडे तेल टाकून त्यात कांदा परतवून घ्यावा. तो कांदा लालसर झाल्यावर त्यात लसूण व अद्रक टाकावे. मग त्या खोबराकीस टाकून खरपूस भाजून घ्यावा. अशाप्रकारे ग्रेव्ही बनविण्यासाठी मसाला भाजून घ्यावा व हा मसाला मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावा व मसाला वाटताना त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालावे.
- 3
आता एका कढईमध्ये तीन टेबलस्पून तेल टाकावे. तेल गरम झाल्यावर त्यात थोडा बारीक चिरलेला कांदा टाकावा. त्याला ब्राऊन कलर आला की यामध्ये वाटलेला मसाला टाकावा. तेल सुटेपर्यंत हे मिश्रण परतत राहावे.
- 4
तेल सुटले की त्यामध्ये तिखट, हळद, जिरेपूड, धनेपूड, मीठ घालावे व त्याला छान परतवून घ्यावे आणि त्यावर झाकण ठेवून पाच मिनिटे मसाला शिजू द्यावा. दुसऱ्या एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवावे व ते पाणी गरम झाले की थोडे थोडे करून त्या मसाल्यामध्ये पाणी टाकून आवडीनुसार ग्रेव्ही पातळ करावी. झाकण ठेवून एक उकळी येऊ द्यावी व त्यामध्ये कोथिंबीर घालावी. अशा प्रकारे सोप्यात सोप्या पद्धतीने मसालेदार अंडाकरी खाण्यासाठी तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#GA4 #week4 #gravyमाया दमई यांची रेसिपी करून बघितली. थँक्यू Ankita Cookpad -
अंडाकरी (anda curry recipe in marathi)
#cf घरी कधी ही भाजीला काही नसले की तयार असतात. ते म्हणजे अंडे .सगळ्यानां कधी ही आवडणारी अंडाकरी Suchita Ingole Lavhale -
-
अंडाकरी (anda curry recipe in marathi)
#अंडाकरी#सर्वांच्या आवडीची साधी व सोपी झटपट बनणारी भाजी म्हणजे अंडाकरी Dilip Bele -
दही भेंडी (dahi bhendi recipe in marathi)
#GA4 #week4Post 1Gravyगोल्डन एप्रन साठी ग्रेव्ही हा किवर्ड घेऊन मी दही भेंडी बनवली. स्मिता जाधव -
-
-
मशरूम्स मसाला ग्रेव्ही (mushroon masala gravy recipe in marathi)
#GA4 #Week4 Geetanjali Kshirsagar-Bankar -
-
-
-
विदर्भ स्पेशल सावजी अंडाकरी (saoji anda curry recipe in marathi)
#सावजीअंडाकरीविदर्भीय लोक जेवणाच्या बाबतीत अतिशय आग्रही, विदर्भातील लोकांचा आदरतिथ्याचा गुण तर सर्वश्रुतच आहे. बिंदास, बेधडक, एक रांगडा व्यक्तिमत्वाचे येथील लोक येणाऱ्या जाणाऱ्याशी सहज ओळख करून घेत.. तंबाखूची डबी काढून, "चुन्याची पुडी हाय का जी"? असे विचारणारे.... "विदर्भातले जेवण" म्हणजे जहाल तिखटच, असं कित्येकांना वाटतं.'.. पण तसं नाही, काही विशिष्ट वर्गातले लोक तिखट खातात. मात्र इथला सुविख्यात असा "सावजी" प्रकार तिखटच असतो हे अगदी खरे..विदर्भ म्हटलं की सावजी हे नाव हमखास येतच. सावजी ग्रेव्ही, सावजी मटण, पाटोड्या, कोथिंबीर वड्या ही विदर्भाची खासियतच. अशीच खास विदर्भाय रेसिपी म्हणजे.. "सावजी अंडा करी"....बऱ्याच ठिकाणी अंडाकरी करताना उकडलेले अंडे तळून घेतात. मग ते मसाल्यामध्ये घालतात. पण मला तळलेले अंडे आवडत नसल्याने मी तसे केले नाही. पण जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की करून बघा. त्याची सुद्धा एक वेगळीच टेस्ट असते.तसेच बऱ्याच वेळा या अंडाकरी मध्ये टमाटर चा देखील वापर करतात, टमाटर घातल्याने थोडा टॅंगी फ्लेवर येतो. अप्रतिम लागते. शेवटी काय पदार्थ एकच असला तरी बनविणारी हात वेगवेगळे आणि प्रत्येकाचा पदार्थ, आवडी-निवडी ह्या वेगवेगळ्या असणारच. आणि असायलाच हव्यात.. नाही का..? चला तर मग करायचा.. सावजी चमचमीत आणि तितकाच चवदार पदार्थ खास नागपूरचा सावजी अंडा करी Vasudha Gudhe -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
नवरात्र असल्यामुळे नॉन वेज खाता आले नाही. बऱ्याच दिवसापासून नॉन वेज खाल्ले नाही त्यामुळे नॉन वेज ची आठवण खूप आली. फ्रीज मध्ये अंडे होते.अंड्यापासून बनणारे पदार्थ हे माझे ऑल टाईम फेवरेट पदार्थ आहे.अंड्या मध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन जास्त असतात. त्यामुळे आज अंडा करी बनवीत आहे. rucha dachewar -
दम आलू ग्रेव्ही (dum aloo gravy recipe in marathi)
#GA4 #week4 #gravy #दमआलूकधी जेवणात बदल म्हणून तर कधी पाहूणे आल्यावर मेन कोर्स साठी बनवायला "दम आलू ग्रेव्ही" ही रोटी, नान, प्लेन राईस, जिरा राईस बरोबर खायला खूपच टेस्टी लागते. बनवायला पण अगदी सोपी आणि झटपट होणारी अशी रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
अंडयाचा मसाला घालून रस्सा मी नेहमी करते. आज अंडा करी करून पाहिली. खूपच छान झालेली. सर्वांना आवडली. Sujata Gengaje -
ग्रिनग्रेव्ही विथ ब्राऊन फ्राय अंडे (green gravy with fry anda recipe in marathi)
#GA4#week4आज मला ग्रिन ग्रेव्ही बनविण्याची इच्छा झाली .लाल मिरची पावडर ,धने पावडर व गरम मसाला न वापरता ग्रेव्ही बनविली .आपल्याला नक्कीच आवडेल . Dilip Bele -
अंडा करी एकदम झणझणीत (anda curry recipe in marathi)
आज संडे आणि संडे म्हटले की घरी नॉनव्हेज असलेच पाहिजे पण आज नॉनव्हेज न्हवते तर त्याला पर्याय म्हणजे अंडा करी आणि ते ही झणझणीत पाहिजे सर्वांना म्हणून सर्वांना आवडेल अशी ही अंडा करी बनवली Maya Bawane Damai -
अंड्याची भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
मागे मी उकडलेल्या अंड्याची भुर्जी ची रेसिपी सांगितली होती.आज मी फोडलेल्या अंड्याची भुर्जी करत आहे. अतिशय लवकर होणारा हा पदार्थ आहे.अंड्या मध्ये प्रोटीन जास्त असतात.कोणत्याही प्रकारचे मसाले न वापरता झटपट होणारी ही भाजी आहे.भारता मध्ये स्ट्रीट फूड म्हणून अंड्याची भुर्जी प्रसिद्ध आहे.बटर लावलेले गरम पाव किंवा पराठे याबरोबरच ही भुर्जी खूप सुंदर लागते.नाष्टा, लंच आणि डिनर मध्ये अंड्याच्या भूर्जीचा वापर करता येतो. rucha dachewar -
कांदा बटाटा ग्रेव्ही (बटाट्याच भूजण) (kanda batata gravy recipe in marathi)
#GA4 #week4मी #ग्रेव्ही #gravy हा keyword घेऊन बनवली कांदा बटाटा ग्रेव्ही (बटाट्याच भूजण) Minal Naik -
अंडा करी रेसिपी (anda curry recipe in marathi)
#worldeggchalege#अंडा करी रेसपीअंडे हे लहान मुला पासून तर मोठ्यां पर्यन्त सर्वानाच उपयुक्त आहे सन्डे हो या मनडे रोज खाये अंडे असे स्लोगन आहे Prabha Shambharkar -
-
-
विदर्भ स्पेशल झणझणीत डाळ कांदा (dal kanda recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रमहाराष्ट्रात विदर्भात डाळ कांदा खूप लोकप्रिय आहे. विदर्भात डाळ कांदा सर्वांचा आवडीचा आहे. कोणताही समारंभ असो डाळ कांदा असतोच. विदर्भात लग्ना मध्ये सुद्धा डाळ कांदा केल्या जातो. आणि आवडीने खातात पण कारण डाळ कांदयाची भाजी खूप छान लागते. Sandhya Chimurkar -
मशरुम मसाला (mushroom masala recipe in marathi)
#GA4 #week4#gravyमशरुम मसाला अतिशय चविष्ट व झटपट होणारा हा पदार्थ आहे. घरात उपलब्ध असलेल्या साहित्य पासून ग्रेव्ही बनवली आहे .असा सोपा पदार्थ एकदा नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
अंडा बिर्याणी (anda biryani recipe in marathi)
#brअंडे नेहमीच खातो. तब्येती करता उत्तम असतं. पण नेहमीच भुर्जी, ऑमलेट, भजी वेगळे प्रकार करतोच. पण बिर्याणी कधीही रोज केली तरी कंटाळा न येता आवडीने केली जाते आणि खाल्ली जाते. चला तर मग बघुया रेसिपी.. Vrishali Potdar-More -
"झणझणीत अंडा करी" (anda curry recipe in marathi)
#cf#cooksnap#deepti_padiyar" झणझणीत अंडा करी " आज दीप्ती ची झणझणीत अंडा करीची रेसिपी कूक स्नॅप केली आहे..आपल्या कूकपॅड वरील सर्वात पेरफेक्षनिस्ट आणि सर्वगुणसंपन्न म्हणजे दीप्ती पडियार...!!आणि तिच्या रेसिपीज...तर नयनरम्य असतात..!! मी सध्या आईच्या ऑपरेशन मुळे आई कडे राहतेय,त्या मुळे जास्त रेसिपी नाही जमत आहेत करायला... पण माझ्या बाबांना अंड्याच्या सर्व रेसिपी खूप आवडतात, तेव्हा दिप्तीची ही रेसिपी मी खास त्यांच्या साठी केली आहे... तुम्हीही नक्की करून पाहा...👌👌 Shital Siddhesh Raut -
सावजी अंडाकरी (sawaji anda curry recipe in marathi)
#अंडसावजी आणि नागपूर समीकरणच सावजीम्हटलं की झणझणीत चविष्ट असे वेगवेगळे पदार्थ समोर येतात नागपूरला कोणी आल्यावर कोणी सावजी खाणार नाही असं होऊच शकत नाही याचा मसाला थोडा वेगळा असतो आणि त्या मासाल्यातच खरी मजा आहे Deepali dake Kulkarni -
-
रेड ग्रेव्ही मसाला (Red Gravy Masala Recipe In Marathi)
#ग्रेव्ही#ग्रेव्ही मसाला#रेड#Red Gravy Masala Sampada Shrungarpure -
More Recipes
टिप्पण्या