दम आलू ग्रेव्ही (dum aloo gravy recipe in marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#GA4 #week4 #gravy #दमआलू
कधी जेवणात बदल म्हणून तर कधी पाहूणे आल्यावर मेन कोर्स साठी बनवायला "दम आलू ग्रेव्ही" ही रोटी, नान, प्लेन राईस, जिरा राईस बरोबर खायला खूपच टेस्टी लागते. बनवायला पण अगदी सोपी आणि झटपट होणारी अशी रेसिपी देत आहे.

दम आलू ग्रेव्ही (dum aloo gravy recipe in marathi)

#GA4 #week4 #gravy #दमआलू
कधी जेवणात बदल म्हणून तर कधी पाहूणे आल्यावर मेन कोर्स साठी बनवायला "दम आलू ग्रेव्ही" ही रोटी, नान, प्लेन राईस, जिरा राईस बरोबर खायला खूपच टेस्टी लागते. बनवायला पण अगदी सोपी आणि झटपट होणारी अशी रेसिपी देत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
४ जणांसाठी
  1. ५०० ग्रॅमलहान बटाटे
  2. ग्रेव्ही साठी
  3. 3मोठे कांदे
  4. 2मोठे टोमॅटो
  5. 1/2 टीस्पूनजिरे
  6. 1/2 टीस्पूनधणे
  7. 1/2 टीस्पूनमीरे
  8. 1 इंचदालचिनी तूकडा
  9. 1काळी वेलची
  10. 6काजू
  11. फोडणीसाठी मसाला
  12. 2 टेबलस्पूनतेल
  13. 1 टीस्पूनबटर
  14. 2 टीस्पूनतिखट पूड
  15. 1 टीस्पूनहळद
  16. 1 टीस्पूनधणे-जिरे पावडर
  17. 1 टीस्पूनगरम मसाला
  18. 2 टीस्पूनमीठ
  19. 1/2 टीस्पूनसाखर
  20. 1 टीस्पूनकसूरी मेथी
  21. 2 टेबलस्पूनदही

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    मिनी पोटॅटो कुकर मधून एक शिटी काढून शिजवून घ्यावे. मग गार झाल्यावर त्याची सालं काढून बटाट्यांना फोक ने (काटा) टोचून थोड्या तेलात जरासे तिखट, हळद आणि मीठ घालून फ्राय करुन घ्यावे.

  2. 2

    ग्रेव्ही साठी एका पॅममधे कांदा आणि टोमॅटोच्या मोठ्या फोडी करुन घालून त्यात धणे, जिरे, काळी वेलची, काजू, दालचिनी, मीरे आणि ‌एक कप पाणी घालून शिजवून घ्यावे. नंतर गार झाल्यावर त्याची प्युरी करावी. मग पॅममधे तेल घालून त्यात तिखट पूड, हळद, धणे-जिरे पूड, गरम मसाला, मीठ आणि साखर घालून मिक्स करुन त्यात कांदा टोमॅटोची प्युरी घालून परतून घ्यावे.

  3. 3

    मग त्यात दही घालून चांगले परतावे. नंतर त्यात बटर आणि कसूरी मेथी घालून मिक्स करावी.

  4. 4

    मग ग्रेव्हीमधे फ्राय केलेले मिनी पोटॅटो घालून झाकण ठेवून मंद आचेवर पाच मिनिटे उकळावे.

  5. 5

    एका बाऊलमधे गरमागरम दम आलू ग्रेव्ही घालून सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes