मसाला दूध (masala dudh recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#शरदाचंचांदणं अर्थात #आश्विनपौर्णिमा
#नवान्नपौर्णिमा #कोजागिरीपौर्णिमा
आपले आरोग्य आणि भारतीय सण ,उत्सव,परंपरा यांचा घनिष्ठ संबंध असतोच..हे सण शरीर आणि मनाचे आरोग्य देखील जपतात बरं का..सणांच्या चैतन्यलहरींमुळे आपोआपच मन प्रसन्न ,हलके आनंदी होते..सुहृदांशी गाठीभेटी ,गप्पा मनावरचा ताण हलका करुन मनाला परत ताजेतवाने करतात ..बरोबर ना...ऋतूंना अनुसरुन सणांच्या निमित्ताने शरीराला पोषक,आवश्यक असे एक से एक पदार्थ तयार केले गेलेत..आता आजचच पहा ना..शरद ऋतू येतो पावसाळ्याच्या अखेरीस..अशा या शरद ऋतूत दिवसा सूर्याची तीव्रता प्रकर्षाने जाणवते पण रात्री तितक्याच चंद्राच्या शीतलतेने परिपूर्ण असतात..आजच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जास्त जवळ असतो..अशा या शरद पौर्णिमेच्या दिवशी ्खारीक,बदाम,खसखस,साखर,जायफळ,वेलची वगैरे पौष्टिक द्रव्यांबरोबर उकळवलेले दूध चांदीच्या भांड्यात ठेवून ते भांडे चंद्राच्या प्रकाशात ठेवतो..आणि चंद्र,चांदण्यांप्रमाणेच श्वेत,धवल वस्त्र परिधान करून शरदाच्या चांदण्यात बसून चंद्राला नैवेद्य दाखवून या दुधाचा आस्वाद आप्तेष्टांसह घेतो..सोबत एखादी गाण्याची मैफल असेल तर वाहव्वा ! हे सगळं सुख पूर्णपणे अनुभवलयं आपल्या पैकी बहुतेकांनी..होय ना. हे सर्व कशासाठी...तर शरीरातील वाढलेलं पित्तशमनासाठी..तसंच या दिवशी उत्तररात्री साक्षात श्रीलक्ष्मीदेवी चंद्रलोकातून पृथ्वीवर भ्रमण करीत असताना" को जागर्ति " असे विचारतात...म्हणजे कोण जागे आहे ,सजग आहे ज्ञानप्राप्तीसाठी... म्हणूनच याला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात...याच साठी आज जागरण करतात...लक्ष्मीदेवीची पूजा करतो.चला तर मग "उगवला चंद्र पुनवेचा" म्हणत गप्पांचा फड ,हास्याची कारंजी,चंद्राच्या शीतल प्रकाशकिरणात न्हाऊन,गोड केशरीदुधासोबत साजरीकरु

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तीस मिनिटे
4 जणांना
  1. 1 लिटरदूध
  2. 5 टेबलस्पूनसाखर
  3. 10-12बदाम
  4. 10-12काजू
  5. 8-10पिस्ता
  6. 10-12केशर कांड्या
  7. 1/4 टीस्पूनजायफळ पूड
  8. 1/4 टीस्पूनवेलचीपूड

कुकिंग सूचना

तीस मिनिटे
  1. 1

    प्रथम दूध तापत ठेवावे. दूध तापले की त्यात साखर घालून 15 ते 20 मिनिटे उकळू द्यावे. केशर देखील आत्ताच दुधा मध्ये ॲड करा.

  2. 2

    तोपर्यंत काजू बदाम पिस्ता यांची मिक्सरवर भरडसर पूड करून घ्यावी. यासाठी मिक्सर फक्त पल्स करावा म्हणजे पूड तेलकट होणार नाही.

  3. 3

    आता यामधील आपल्या आवडीनुसार तीन ते चार टेबलस्पून ही पूड दुधात घालून परत दूध पाच मिनिट उकळून घ्या नंतर यात जायफळ पूड,वेलची पूड घालून दूध व्यवस्थित ढवळून घ्या आणि परत तीन ते चार मिनिट दूध उकळून घ्या. आपले मसाला दूध तयार झाले.

  4. 4

    तयार झालेले मसाला दूध

  5. 5

    थंडगार करून चांदीच्या ग्लासमध्ये सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes