पनीर तुर कोफ्ता (paneer tur kofta recipe in marathi)

Snehal Bhoyar Vihire
Snehal Bhoyar Vihire @cook_26235133

पनीर तुर कोफ्ता (paneer tur kofta recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15min
4 सर्व्हिंग्ज
  1. ३००ग्रॅम फ्रेश पनीर
  2. १/२ किलो तुरीच्या शेंगा
  3. 3कांदे
  4. 4 ते ५ हिरव्या मिरच्या
  5. ४ते ५ लसुण पाकळ्या
  6. 1 छोटातुकडा आल
  7. 4काजू
  8. 4बदाम
  9. 1टोमॅटो
  10. 2 टेबलस्पूनतिखट
  11. 1 टेबलस्पूनहळद
  12. 1 टेबलस्पूनजीरे पावडर
  13. 1 टेबलस्पूनधने पावडर
  14. 1/2 टेबलस्पूनगरम मसाला
  15. आवश्यकतेुसार मीठ
  16. 2 टेबलस्पूनकॉर्न फ्लोअर
  17. थोडी साखर
  18. तेल
  19. बारीक चिरलेली कोथिंबीर

कुकिंग सूचना

15min
  1. 1

    सर्वप्रथम तुरीच्या शेंगा चे दाणे काढून घ्यावे, व मिक्सर मधून बारीक करावे. एका बाउल मध्ये पनीर किसून घ्यावे.

  2. 2

    नंतर त्या बाउल मधे तुरीच्या शेंगा चे मिश्रण घालावे. त्यात तिखट, मीठ,धणेपूड, जिरेपूड, गरम मसाला व हळद घालून ते मिश्रण एकजिव करावे.

  3. 3

    आता त्या सारणात थोडे कॉर्न फ्लोअर टाकावे.. व ते छान मिक्स करुन छोटे छोटे कोफ्ते तयार करावे. व तेलात deep फ्राय करून घ्यावे..

  4. 4

    नंतर १ कढई मध्ये तेल टाकून त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा व त्याला छान परतावा.त्यात आले लसुण पाकळ्या, मिरची, काजु बदाम टाकावे. व २ मिन परतावे. त्यात तिखट धणेपूड जिरेपूड मीठ हळद गरम मसाला घालून थोडा वेळ शिजु द्यावे.

  5. 5

    नंतर त्यात थोडे थोडे पाणी घालून उकळी येऊ द्यावी.. व ते मिश्रण मिक्सर मधून बारीक करावे..

  6. 6

    परत कडाई मधे थोडे तेल टाकून त्यात ते मिश्रण घालावे. व उकळू द्यावे.

  7. 7

    उकळी आली की त्यात थोडा पाव भाजी मसाला घालावा व बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.. ग्रेव्ही तयार.

  8. 8

    ही ग्रेव्ही पनीर तूर कोफ्ता बरोबर सर्व्ह करावी. खूप चविष्ट लागते..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Snehal Bhoyar Vihire
Snehal Bhoyar Vihire @cook_26235133
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes