चिली पोटॅटो (chilly potato recipe in marathi)

Shanti mane
Shanti mane @spmf4u
डोंबिवली

चिली पोटॅटो (chilly potato recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
4 सर्व्हिंग्ज
  1. 3बटाटे (मध्यम)
  2. 4 चमचेमैदा
  3. 4 चमचेतांदळाचे पीठ किंवा कॉर्नफ्लोअर
  4. 1 चमचाकॉर्नफ्लोअर
  5. 2सिमला मिरची (मध्यम)
  6. 2कांदे (मध्यम)
  7. 1 चमचासोया सॉस
  8. 2 चमचाचिली सॉस
  9. 2 चमचाटोमॅटो सॉस
  10. 5 ते 6 पाकळ्या लसूण किसून
  11. आलं किसून
  12. 1/2 चमचासाखर
  13. 1 चमचातीळ
  14. तेल
  15. मीठ चवीनुसार
  16. कोथींबीर किंवा कांद्याची पात

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    बटाट्याची साल काढून उभ्या स्टिक कापून पाण्यात स्वच्छ धुऊन घ्या... गॅसवर पाणी गरम करून त्यात मीठ घालून या स्टिक्स 10 मिनटं शिजवून घ्या...पाणी काढून टाका...

  2. 2

    मग पाणी निथळून गेल्यावर त्यावर एक 2 चमचे मैदा आणि तांदळाचे पीठ घालून त्यात चांगलं मिक्स करून घ्या...
    आता पुन्हा 2 चमचे मैदा आणि तांदळाचे पीठ आणि मीठ मिक्स करून त्याची पेस्ट तयार करून घ्या (एकदम पातळ नाही घट्ट नाही अशी)...

  3. 3

    आता स्टिक्स या मिश्रणात मिक्स करून एक एक तेलात सोडत सगळ्या मिडीयम गॅस वर 5 मिनटं तळून घ्या... आणि मग 5 मिनटं मोठ्या गॅसवर तळून घ्या...

  4. 4

    पॅनमध्ये तेल घेऊन त्यात किसून घेतलेले लसूण, आलं घाला चांगलं परतून घ्या मग त्यात मोठे तुकडे केलेले कांद्याचे काप आणि सिमला मिरची घाला मोठ्या गॅसवर हे 5 मिनटं परतून घ्या

  5. 5

    त्यातच तीळ, सोयासॉस, टोमॅटो सॉस, चिली सॉस घालून मिक्स करा...चवीनुसार मीठ आणि साखर घाला... आता यात एक छोटी वाटी पाणी घालून चांगली उकळी येऊ द्या मग त्यातच कॉर्नफ्लोअर पाण्यात मिक्स करून ती पेस्ट टाका...

  6. 6

    मिश्रण ढवळत राहा जरा घट्टपणा येईल तेव्हा त्यात पोटॅटो स्टिक्स घाला आणि चांगलं मिक्स करून घ्या.... एका बाऊलमध्ये चिली पोटॅटो घेऊन त्यावर कांद्याची पात किंवा कोथिंबीर आणि भाजलेले तीळ घालून सर्व्ह करा..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shanti mane
Shanti mane @spmf4u
रोजी
डोंबिवली

Similar Recipes