वडा सांबार (vada sambar recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#EB6 #W6 #रेसिपी इ बुक चॅलेंज वडा सांबार नाव निघताच तोंडाला पाणी सुटत होय ना पुर्वी फक्त उडपी हॉटेल मध्येच हे पदार्थ मिळत असे पण आता घरोघरी पोटभरीचा नाष्टा म्हणुन वडा सांबार केला जातो चला तर हा नाष्टा कसा करायचा ते बघुया

वडा सांबार (vada sambar recipe in marathi)

#EB6 #W6 #रेसिपी इ बुक चॅलेंज वडा सांबार नाव निघताच तोंडाला पाणी सुटत होय ना पुर्वी फक्त उडपी हॉटेल मध्येच हे पदार्थ मिळत असे पण आता घरोघरी पोटभरीचा नाष्टा म्हणुन वडा सांबार केला जातो चला तर हा नाष्टा कसा करायचा ते बघुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
२-४ जणांसाठी
  1. १०० ग्रॅम उडीदडाळ+२ टेबलस्पुन मुगडाळ+ १/२ टिस्पुन मेथी दाणे
  2. 3कांदे
  3. 2टोमॅटो
  4. ४० ग्रॅम तुकडे शेवग्याच्या शेंगाचे
  5. 2 टेबलस्पुनमुळ्याचे काप
  6. 1/4 टीस्पूनहळद
  7. 1 पिंचहिंग
  8. 1 टीस्पूनमोहरी
  9. 1/2 टीस्पूनजीरे
  10. 7-8कडिपत्याची पाने
  11. 2 टीस्पूनकाश्मिरी तिखट
  12. 1-2 टेबलस्पुनसांबार मसाला
  13. 1 टेबलस्पुनचिंचेचा कोळ
  14. 1 टेबलस्पुनगुळ
  15. 2 टेबलस्पुनओले खोबरे
  16. 1-2लाल सुक्या मिरच्या
  17. 1-2हिरव्या मिरच्या
  18. 1/2 टीस्पूनमिरपुड
  19. 1/2 टीस्पूनइनो
  20. ५० ग्रॅम तुरडाळ+ मेथीदाणा
  21. चविनुसारमीठ
  22. ३०० ग्रॅम तेल

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    उडिद डाळ व मुगडाळ व मेथी दाणा७-८ तास स्वच्छ धुवुन भिजत घाला. तुरडाळ व मेथीदाणा स्वच्छ धुवुन१/२ तास भिजत ठेवा नंतर डाळीत उभा चिरलेले कांदे, टोमॅटो, शेवग्याच्या शेंगाचे तुकडे, मुळ्याचे काप हळद, हिंग, पाणी मिक्स करून २ शिट्टया डाळ उकडुन घ्या

  2. 2

    पातेल्यात तेल गरम करून त्यात मोहरी, जीरे, कडिपत्ता लाल सुक्या मिरच्या, हिंगाची फोडणी करून त्यातच उभा चिरलेला कांदा परतवुन घ्या नंतर त्यात हळद, काश्मिरी तिखट, सांबार मसाला मिक्स करून परता नंतर शिजवलेली डाळ व भाज्या टाका चिंचेचा कोळ, गुळ, ओलखोबरे, मीठ व आवश्यकते नुसार गरमपाणी मिक्स करा व उकळी काढा आपले सांबार रेडी

  3. 3

    भिजलेली उडिद डाळ परत स्वच्छ धुवुन कोरडी करा व मिक्सर मधुन स्मुथ पेस्ट करून त्यात चविनुसार मीठ, मिरची, मिरपुड, व इनो मिक्स करून फेटुन गरम तेलात लगेच वडे तळुन घ्या

  4. 4

    गरम गरम वडे प्लेटमध्ये व गरम सांबार बाऊलमध्ये वाढुन डिश सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या (2)

Similar Recipes