रताळे आणि गाजरचे सूप (ratade ani gajrache soup recipe in marathi)

Archana Gajbhiye
Archana Gajbhiye @cook_26553233

#GA4 #Week20
#soup हा कीवर्ड घेऊन मी रताळे आणि गाजरचे सूप बनविले आहे. हे सूप पौष्टिक आणि चवदार आहे. जेव्हा रात्रीचे जेवण घेण्याची इच्छा नसते तेव्हा हे सूप छान पर्याय आहे. हे सूप मी तेल न वापरता, मातीच्या भांड्यात बनविले आहे.

रताळे आणि गाजरचे सूप (ratade ani gajrache soup recipe in marathi)

#GA4 #Week20
#soup हा कीवर्ड घेऊन मी रताळे आणि गाजरचे सूप बनविले आहे. हे सूप पौष्टिक आणि चवदार आहे. जेव्हा रात्रीचे जेवण घेण्याची इच्छा नसते तेव्हा हे सूप छान पर्याय आहे. हे सूप मी तेल न वापरता, मातीच्या भांड्यात बनविले आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० ते ४० मिनिटे
२ जणांसाठी
  1. 2 कपगाजराचे काप
  2. 1 कपरताळ्याचे काप
  3. 2 (1/2 कप)पाणी
  4. 1 टीस्पूनआल्याचे काप
  5. 1हिरवी मिरचीचे काप
  6. 1/2 टीस्पूनजीरे
  7. 1/4 टीस्पूनधणे
  8. मीठ चवीनुसार
  9. टॉपिंग साठी घटक
  10. 1/2 कपउकडलेले रताळ्याचे काप
  11. 1/4 टीस्पूनमोहरी
  12. 1/2 टीस्पूनजीरे
  13. 1/2 टीस्पूनटिस्पून मीठ
  14. कोथिंबीर आवडीप्रमाणे

कुकिंग सूचना

३० ते ४० मिनिटे
  1. 1

    प्रथम आल्याचे काप, धणे, जीरे, आणि मिरचीचे काप तव्यावर किंवा कढईमध्ये भाजून घ्यावे. नंतर एका मातीच्या भांड्यात गाजर आणि रताळ्याचे काप घालावे आणि त्यात भाजलेले मिश्रण घालावे.

  2. 2

    नंतर त्यात २१/२ कप पाणी घालावे आणि २० मिनिटे झाकण ठेवून शिजवावे. २० मिनिटांनंतर झाकण काढून रताळ्याचे काप चमच्याने दाबून बघावे.

  3. 3

    नंतर हे मिश्रण थंड करायला ठेवावे आणि थंड झाले की एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यावे आणि वाटून घ्यावे, नंतर त्यात मीठ चवीनुसार घालून पुन्हा वाटून घ्यावे.

  4. 4

    नंतर एका कढईमध्ये मोहरी, जीरे भाजून घ्यावे आणि त्यात उकडलेले रताळ्याचे काप घालून मिक्स करावे.

  5. 5

    टाॅपिंगचे घटक तयार आहे, हे मिश्रण एका बाउल मध्ये काढून घ्यावे. आता तयार झालेले सूप एका बाउल मध्ये काढून घ्यावे आणि वरून तयार केलेले टाॅपिंग घटक घालून त्यात कोथिंबीर घालावी आणि सूप सर्व्ह करावे.

  6. 6

    या सूप मध्ये सेंधे मीठ घालून तुम्ही अजून पौष्टिक आणि चवदार बनवू शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Archana Gajbhiye
Archana Gajbhiye @cook_26553233
रोजी

Similar Recipes