मंचाव सूप (manchow soup recipe in marathi)

Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
पुणे

#soup
#hs
कारण घरात सर्वांचे आवडतं सूप आहे

मंचाव सूप (manchow soup recipe in marathi)

#soup
#hs
कारण घरात सर्वांचे आवडतं सूप आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीकोबी
  2. 1/4 वाटीगाजर
  3. 1/4 वाटीबीन्स
  4. 1/4 वाटीकांदा पात
  5. 1कांदा
  6. 10-12लसूण पाकळ्या
  7. 1.5 इंचआलं
  8. 2हिरवी मिरची
  9. 1/2पॅकेट हक्का नूडल्स
  10. 2 टेबलस्पूनसोयासॉस
  11. 2 टेबलस्पूनचिली सॉस
  12. 2 टेबलस्पूनटोमॅटो केचप
  13. 4 टेबलस्पूनकॉर्नफ्लावर
  14. गरजेनुसार तेल
  15. चवीनुसारमीठ
  16. गरजेनुसार पाणी
  17. 1 टेबलस्पूनकाळी मिरी पावडर
  18. 1 टेबलस्पूनबटर
  19. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  20. कोथिंबीर

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    प्रथम सर्व भाज्या स्वच्छ धुवून बारीक कट करून घेणे. हक्का नूडल्स शिजवून घेणे. शिजवताना नूडल्स मध्ये एक टेबलस्पून तेल ॲड करणे त्यामुळे नूडल्स चिटकत नाही.

  2. 2

    आता शिजविलेल्या नूडल्स चे पाणी वेगळे काढून घेणे.या पाण्याचा सुद्धा उपयोग आपण सूपमध्ये करू शकतो.

  3. 3

    आता नूडल्स तळण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करा आणि नूडल्स मध्ये कॉर्नफ्लावर ऍड करून मिक्स करा आणि मध्यम आचेवर नूडल्स तळून घ्या.

  4. 4

    आता पॅनमध्ये बटर ऍड करा आणि मध्यम आचेवर गरम करून घ्या.आता यामध्ये कट केलेले लसूण,आलं, मिरची ऍड करून दोन मिनिटे परतून घ्या.त्यानंतर त्यामध्ये कांदा ऍड करा आणि छान परतून घ्या.

  5. 5

    आता कांदा परतल्यानंतर यामध्ये कट केलेल्या सर्व भाज्या ॲड करा आणि दोन मिनिटे भाज्या परतून घेणे. आता यामध्ये लाल तिखट आणि काळी मिरी पावडर ऍड करून मिक्स करून घेणे.

  6. 6

    आता यामध्ये सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो सॉस आणि चवीनुसार मीठ ऍड करा आणि छान मिक्स करून घ्या.आता नूडल्स शिजविताना बाजूला काढलेले पाणी ॲड करा आणि दोन मिनिट भाज्या शिजवून घ्या.

  7. 7

    आता गरजेनुसार अजून पाणी ऍड करा आणि सूपला घट्टपणा येण्यासाठी दोन टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर मध्ये थोडेसे पाणी मिक्स करून ते सूप मध्ये ॲड करा आणि छान मिक्स करून घ्या सुपला छान उकळी येऊ द्यात.

  8. 8

    आता वरून कांदा पात आणि थोडीशी कोथिंबीर ऍड करा आपले टेस्टी मंचाव सूप तयार तळलेल्या नूडल्स सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
रोजी
पुणे

टिप्पण्या

Similar Recipes