रोस्टेड व्हेजिटेबल सूप (Roasted vegetables Soup recipe in marathi)

Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012

#GA4 #Week20
Soup , Garlic bread या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे.
हे सूप एकदम साधे सोपे पण अतिशय हेल्दी आहे.
मी यात माझ्या आवडीप्रमाणे आणि ज्या भाज्या उपलब्ध आहेत त्या वापरून मी हे सूप केले आहे तसेच मी यात काॅनफ्लोर मैदा वापरला नाही.

रोस्टेड व्हेजिटेबल सूप (Roasted vegetables Soup recipe in marathi)

#GA4 #Week20
Soup , Garlic bread या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे.
हे सूप एकदम साधे सोपे पण अतिशय हेल्दी आहे.
मी यात माझ्या आवडीप्रमाणे आणि ज्या भाज्या उपलब्ध आहेत त्या वापरून मी हे सूप केले आहे तसेच मी यात काॅनफ्लोर मैदा वापरला नाही.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 1-2टोमॅटो
  2. 3-4लसूण पाकळ्या
  3. 1/2 इंचआले
  4. 1/2कांदा
  5. 1/2गाजर
  6. 1/2ढोबळी मिरची (लाल+हिरवी+पिवळी)
  7. 2-3ब्रोकोलीचे तुकडे
  8. कोथिंबीर आणि कोथिंबीरीच्या काड्या
  9. 2तमालपत्र
  10. 7-8काळी मिरी
  11. 2लवंग
  12. 1/2 टीस्पूनधने जीरे पावडर
  13. चवीनुसारमीठ
  14. 2 टेबलस्पूनऑलिव्ह ऑइल
  15. 1/2 टीस्पूनबटर
  16. 1 टीस्पूनसाखर
  17. 1-2 कपपाणी
  18. 1-2ब्रेड स्लाइस + बटर+ कोथिंबीर+गार्लिक पावडर

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    ओव्हन सेफ पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल घालून त्यात सर्व भाज्या लसूण आलं कोथिंबीर मीठ धने जीरे पावडर लवंग काळी मिरी तमालपत्र घालावे.

  2. 2

    220 डिग्रीला ओव्हन प्रीहिट करून पॅन 15 मिनिटे ठेवावा आणि मिक्सरमध्ये सर्व मिश्रण साखर घालून बारीक वाटून घ्यावे. एका भांड्यात बटर तेल घालावे आणि मिक्सरमध्ये वाटलेले मिश्रण गाळून घालावे थोडे पाणी वापरावे.(मी सूप गाळून उकळून घेतले त्यामुळे भाजीचा चोथा आणि खडा मसाला सूप घेताना तोंडात येत नाही)

  3. 3

    7-8 मिनिटे उकळू द्यावे तोपर्यंत ब्रेड स्लाइसला बटर कोथिंबीर गार्लिक पावडर लावून भाजून घ्या. सूप घट्ट झाल की गॅस बंद करून रोस्टेड व्हेजिटेबल सूप कोथिंबीर घालून भाजलेल्या गार्लिक ब्रेड स्लाइस बरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012
रोजी
I Love cooking.. 😋
पुढे वाचा

Similar Recipes