राजमा पापड कोन (rajma papad cone recipe in marathi)

Rohini Kelapure
Rohini Kelapure @cook_25511830
पुणे

#GA4
#Week21
#राजमा हा कीवर्ड घेऊन हे मस्त फिंगर फूड बनवले आहे.

राजमा सहसा राइस किंवा जिरा राईस बरोबर खाल्ला जातो. पण हल्ली फ्युजनचा जमाना आला आहे. तसंच हेल्थ केअरचाही. ह्यात तळलेले पापड न घेता भाजलेले घेतलेले आहेत, तसंच प्रोटीन्स भरपूर आहेत.

पापड रोल हा पार्टी मध्ये स्टार्टर म्हणून किंवा हाई टी मध्ये, किटी मध्ये करण्याजोगा आहे. अगदी हिट होईल ही guarantee आहे आणि हो, अनुभव सुध्दा. नक्की करून पहा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
2  व्यक्ती
  1. 1/2 वाटीराजमा
  2. 4पापड
  3. 1/2 वाटीटोमॅटो केचप
  4. 1/2 चमचामिरपूड
  5. मीठ

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    राजमा रात्रभर भरपूर पाण्यात भिजत घालावा. सकाळी थोडेसे मीठ घालून कुकरमध्ये शिजवून घ्यावा.

  2. 2

    पापड अर्धे करावेत.

  3. 3

    एका भांड्यात शिजवलेला राजमा, टोमॅटो केचप आणि मिरपूड एकत्र करून पाणी थोडे आटे पर्यंत शिजवून घ्यावा.

  4. 4

    पापडाचे तुकडे आचेवर भाजून घ्यावेत. लगेच त्यांचे कोन बनवून घ्यावेत.

  5. 5

    आता आपला राजमा आणि कोन दोन्ही तयार आहेत. एकेका कोन मध्ये हलक्या हाताने राजमा भरावा. आणि लगेच त्याचा आस्वाद घ्यावा नाहीतर soggy होते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rohini Kelapure
Rohini Kelapure @cook_25511830
रोजी
पुणे

टिप्पण्या

Similar Recipes