रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)

Archana Gajbhiye
Archana Gajbhiye @cook_26553233

ढोकळा म्हटला की आपल्या डोळ्यासमोर खमन ढोकळाच येतो पण कधीतरी वेगळी काही चव हवी असते नेहमी तीच तीच चव जिभेला नको असते आणि रोज रोज नाश्त्याला काय करावे हा प्रश्न तर रोजचाच असतो आणि पोहे, उपमा खाण्यास नेहमी कंटाळा येतो म्हणून झटपट बनणारा रवा ढोकळा हा उत्तम पर्याय आहे. रवा ढोकळा उपमा सारखा न लागता छान आणि स्पोंजी असा होतो. रवा ढोकळा नाश्त्याला आणि मुलांच्या टिफिनमध्ये पण देता येईल. रवा ढोकळा योग्य प्रमाण घेऊन जर केला तर ढोकळा अगदी भरपूर फुलून जाळीदार होऊन मार्केट सारखा स्पोंजी होईल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
४ जणांसाठी
  1. 1 कपरवा
  2. 1 कपदही
  3. 2 टीस्पूनतेल
  4. 1 टीस्पूनसाखर
  5. 1 टीस्पूनइनो
  6. मीठ चवीनुसार
  7. 1 टीस्पूनमोहरी (तडका देण्यासाठी घटक)
  8. 10-12 कढीपत्त्याची पाने
  9. 1/4 टीस्पूनहिंग
  10. तेल गरजेनुसार
  11. 2हिरवी मिरची चे तुकडे

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    प्रथम एका भांड्यात रवा घेऊन त्यात दही, मीठ, साखर, आणि तेल घालून मिक्स करून घ्यावे आणि चांगले फेटून घ्यावे आणि दहा मिनिटे झाकून ठेवावे.

  2. 2

    नंतर एका कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवावे आणि त्यात स्टॅन्ड किंवा रिंग ठेवावी. नंतर एका डब्याला तेल लावून ठेवावे आणि दहा मिनिटांनंतर तयार मिश्रणात इनो टाकून मिक्स करावे.

  3. 3

    नंतर हे मिश्रण डब्यात ओतावे आणि थोडे टॅप करावे नंतर कढईमधल्या पाण्याला उकळी आली की त्यात हा डब्बा ठेवावा आणि १५ मिनिटे वाफवून घ्यावे.

  4. 4

    नंतर एका कढईमध्ये तेल तापवावे आणि त्यात हिंग, मोहरी, कढिपत्ता आणि हिरवी मिरचीचे तुकडे टाकून तडका तयार करून घ्यावा आणि तयार रवा ढोकळ्यावर टाकावे आणि त्याचे काप करावेत आणि वरून कोथिंबीर घालावी.

  5. 5

    आता तयार झटपट रवा ढोकळा हिरव्या चटणीबरोबर किंवा साॅसबरोबर सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Archana Gajbhiye
Archana Gajbhiye @cook_26553233
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes