रगडा पॅटीस (Ragada Pattice recipe in marathi)

#LC रागडा पॅटीस मॅश बटाटा आणि ग्रेव्हीची एक डिश आहे आणि महाराष्ट्र आणि गुजरात या भारतीय राज्यांमधील स्ट्रीट फूड संस्कृतीचा एक भाग आहे. हे उत्तर भारतात अधिक लोकप्रिय, छोले टिक्कीसारखे आहे. ही डिश एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे
रगडा पॅटीस (Ragada Pattice recipe in marathi)
#LC रागडा पॅटीस मॅश बटाटा आणि ग्रेव्हीची एक डिश आहे आणि महाराष्ट्र आणि गुजरात या भारतीय राज्यांमधील स्ट्रीट फूड संस्कृतीचा एक भाग आहे. हे उत्तर भारतात अधिक लोकप्रिय, छोले टिक्कीसारखे आहे. ही डिश एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे
कुकिंग सूचना
- 1
बटाटे उकडून घ्या, वाटाणे कूकर ला ५/६ शिट्या मंद आचेवर द्या. वाटाणे कूकर ला लाऊन मंद आचेवर ४ ते ५ शिटी काढा
- 2
नंतर कढई मधे कांदा टोमॅटो मिरचीआलं लसुण पेस्ट हिंग थोडा गरम मसाला चाट मसाला घालून फोडणी करावी. त्यात शिजवले वाटाणे घालून थोड पाणी व मीठ घालून एकजीव होपर्यंत ५ते १० मिनिट शिजवून घ्यावे. आपला रगडा तयार आहे.
- 3
शिजवलेल्या बटाटे कुस्करून घ्या त्यात आलं लसूण पेस्ट मीठ जीरे, हिंग,आणि हिरवी मिरची पेस्ट चाट मसाला घालावा व बेड क्रम व कारनफ्लवर घालून भरपूर कोथिंबीर घालून मळून घ्यावे नंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून ते चपटे करावे व तव्यावर थोडे तेल घालून ते शालो फा्य करावे
- 4
आता सर्व्हिंग डिश मधे दोन पॅटीस घालून त्याचावर तयार रगडा घालावा.नंतर त्यात थोडी गोड चटणी,थोडी पुदिना चटणी,बारीक शेव,कांदा टोमॅटो व कोथिंबीर घालावी.
चमचमीत रगडा पॅटीस खाण्यासाठी तयार आहे.
Similar Recipes
-
रगडा पॅटीस (Ragda Pattice recipe in marathi)
#KS8# महाराष्ट्र स्ट्रीट फूडआंबट गोड आणि थोडे तिखट चटपटीत रगडा पॅटीस... बाहेर फिरायला गेलो आणि खाल्ले नाही असे फार क्वचीतच होते. Priya Lekurwale -
रगडा पॅटीस (ragada patties recipe in marathi)
#GA4 गोल्डन अप्रोन चॅलेंज ची माझी सुरुवात मी रगडा पॅटीस या बटाट्यापासून पासून तयार केलेल्या पदार्थापासून करत आहे. रगडा पॅटीस हा पदार्थ महाराष्ट्रात स्ट्रीट फूड म्हणून प्रसिद्ध आहे. हा पदार्थ आलू टिक्की म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. रगडा पॅटीस हा पदार्थ उत्तर भारतात सुद्धा प्रसिद्ध आहे rucha dachewar -
रगडा पॅटीस (Ragada Pattice recipe in marathi)
#pe. "रगडा पॅटीस" मुंबई स्ट्रीट फूड रेसिपी आहे.खूब मस्त लागते , एकदा नक्की बनवून बघा🙏🥰🍅 Usha Bhutada -
रगडा पॅटीस (Ragda Pattice recipe in marathi)
#ks8#महाराष्ट्र- स्ट्रीट- फुडरगडा पॅटीस Mamta Bhandakkar -
-
रगडा पॅटीस (Ragda Pattice recipe in marathi)
#ks8रगडा पॅटीस ही चटपटीत रेसिपी माझ्या घरी सगळ्यना आवडते. तशी ही रेसिपी हेल्दी म्हटले तरी चालेल कारण पॅटीस हे तळलेले नाहीत शॅलो फ्राय केलेले आहे.यामुळे लेस ऑईली आहेत. रगड्यासाठी कडधान्य वापरलेले आहे त्यामुळे हेल्दी आहे.चटपटीत लाल व हिरव्या चटणी सोबत हे पॅटीस चविष्ट लागतात. Shilpa Pankaj Desai -
-
रगडा पॅटीस (Ragada Pattice recipe in marathi)
#KS8#रगडा पॅटीसप्रत्येक खाऊ गल्लीत, कॉलेज कट्टा,चौपाटी कुठेही गरम गरम रगडा पॅटीस ,पाणी पुरी,शेवपुरी भेळ म्हणजे भूक असो नसो पोटात जागा होऊनच जाते.मी आज ब्रेकफास्ट ला रगडा पॅटीस केले,सर्व मंडळी खुश Rohini Deshkar -
-
चटपटीत रगडा पॅटीस (ragda pattice recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 #पावसाळी गंमत पावसाळा म्हटला की काही तरी गरमागरम चटपटीत खायची इच्छा होते. आणि बाहेर फिरायला गेलं की हमखास असं चटपटीत गरमागरम पदार्थांची आठवण येतेच. स्ट्रीटफूडमध्ये माझा सर्वात जास्त आवडीचा पदार्थ म्हणजे रगडा पॅटीस. रगडा पॅटीस खाण्यासाठी माझ एक ठरलेल स्पॉट आहे. मी तिथेच खात असते. त्यांच्या दुकानाचं नाव 'बॉम्बे चाट'आहे. तिथे सगळं चाट हायजीन असतं. आणि खूप स्वच्छता बाळगतात. त्यामुळे उन्हाळा,पावसाळा असो किंवा हिवाळा सर्वच ऋतूत मी तिथेच रगडा पॅटीस खात असते.पण 4,5 महिन्यात खाण्याचं तर सोडा त्या वाटेने जायला सुद्धा मिळालेल नाही.आता तर बाहेर खाण्याचा विचारच करावा लागतो कारण आपण सगळे जाणताच😷. पावसाळ्यात जेव्हा ही पाऊस सुरू असतो तेव्हा तो चाट वाला भाऊ आवर्जुन आम्हाला गाडीतच मस्त गरमागरम प्लेट आणून देतो. आणि आम्ही छान पावसात गाडीत बसून खाण्याचा आस्वाद घेत असतो. पण यावर्षी पावसाळ्यात ते क्षण अनुभवायला मिळणार नाही. तेव्हा त्या बॉम्बे चाटच्या आठवणीत आज रगडा पॅटीस केला. पण बघा गम्मत अशी मी ज्यावेळी हयाला केला. त्यावेळी बरोबर पाऊस आला फरक एवढाच की मी गाडीत नव्हे तर घरी गॅलरीत बसून खाण्याचा आस्वाद घेतला.😀 आणि एक मेन गोष्ट म्हणजे मी पहिल्यांदाच केला खूप छान टेस्टी झाला. हल्ली बाहेरच खायचे त्यामुळे घरी करण्याचा कधी योगच नाही आला. त्यामुळे आज स्वतःच्या हाताने करून खाण्याचा भारी आनंद होतोय😁. घरीसुद्धा सर्वांना आवडला. चला तर मग बघुयात मी केलेला रगडा पॅटीस.😍 Shweta Amle -
रगडा पॅटीस (Ragda Pattice recipe in marathi)
#ks8मुंबई-पुण्यात ठिकठिकाणच्या रस्त्यांवर वडापाव,भजी,मूग भजी,दाबेली,दहीवडा,सामोसा,रगडापँटीस,मिसळ यांच्या खाऊगल्ल्या आहेत.एकदा का चव कळली की सुट्टीत किंवा एरवीही बदल म्हणून आपोआप पावलं वळतात.कित्येकांचे सकाळ संध्याकाळचे खाणे या ठिकाणी आरामात होते.कधीकधी हॉटेलींगपेक्षा इकडेही हे चाट आयटम्स खायला खूप गर्दी असते.स्ट्रीटफूड तसं सगळ्यांच्या आवडीचं आणि परवडणेबलही😂तरुणाई असो की वयस्कर,शाळा-कॉलेजवाले किंवा ऑफिसवाले सगळ्यांची भूक शमवणारे हे स्ट्रीटफूडवाले यांची मला नेहमीच उत्सुकता वाटते.किती तयारी करावी लागते हे आपण घरी केले की समजते!दररोज हेच करणं किती अवघड आणि किचकट काम आहे.सगळा कच्चामाल सतत तयार ठेवणं,कांदा,कोथिंबीर चिरण्यासाठी आणि हाताखाली कामगार मंडळी किंवा घरातलीच माणसं किती सज्ज असतात.खूप पेशन्सचा हा धंदा आहे.कधी चालला तर खूप नाहीतर कधी काही नाही...असं हातावरचं पोट असलेलं हे स्ट्रीटफूड!हल्ली महापालिकांचे आणि आरोग्यविभागाचे सतत लक्ष असल्यामुळे स्वच्छता,पदार्थांची चव हे लोकही पाळतात...अर्थात खूप ठिकाणी असं नसतंच,त्यामुळे रस्त्यावरचे खाणे टाळले जाते.मी पहिल्यांदा रगडापँटीस खाल्लं ते माझ्या मोठ्या चुलतबहिणीबरोबर गोरेगावला!!तिला खूप चाट आयटेम्स आवडायचे.सुट्टीत काकांकडे गेलो की ती नेहमी घेऊन जायची...मग भेळ,सामोसे,वडापाव,रगडापुरी,पाणी पुरी,रगडापॅटीसवर जेवणच व्हायचे!पुण्यात मनिषा,गणेश,कल्याण,कल्पना अशी चाट पदार्थांची माझी आवडती ठिकाणं आहेत.अधूनमधून इथे गेल्याशिवाय करमतच नाही.ज्या कोणी हे रगडापँटीस पहिल्यांदा केले असेल त्याला माझा प्रणाम...आज तमाम दुनिया इनके मुठ्ठीमें हैं।चला....आपणही बनवू या स्ट्रीटफूड...जरा चंमतग😃😄👍😋 Sushama Y. Kulkarni -
-
-
रगडा पॅटीस (Ragda Pattice Recipe In Marathi)
#SDRसध्या उन्ह्यालात आंबट गोड चवीचे पदार्थ सर्वांना खूप आवड ता त तेव्हा हि डिश.:-) Anjita Mahajan -
रगडा पॅटिस रेसिपी (स्ट्रीट फूड मुबंई) (ragda patties recipe in marathi)
#ks8#स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र nilam jadhav -
-
रगडा पॅटीस (Ragada Pattice recipe in marathi)
ठेल्यावरची पाणी पुरी, रगडा पुरी, शेव पुरी, ओली,सुकी भेळ, रगडा पॅटीस असे एक ना दोन असंख्य प्रकार .....आणि हे न आवडणारा माणूसच मिळणार नाही. नाव काढताच तोंडाला पाणी सुटणारे असे हे चटकदार पदार्थ....खावून पोट तर भरत नाही पण आनंद आणि समाधान , तृप्ती नक्की मिळते. म्हणूनच मी आज तुमच्यासाठी घेवून आले आहे रगडा पॅटीसची रेसिपी.. Namita Patil -
रगडा पापडी चाट (ragada papadi chat recipe in marathi)
#GA4 #Week6#Chat चाट नक्कीच लहान मुलांपासून ते वृद्ध पर्यंत सर्वांच्याच आवडीचा आहे. मी प्रथमच चाट चा हा प्रकार बनवून बघितला आणि सर्वांना खूप आवडला.Ragini Ronghe
-
-
-
मोड आलेल्या मिक्स कडधान्यांचे (रगडा - पॅटीस)
#Goldenapron3 #week4 #स्प्राऊट्समोड आलेल्या कडधान्यांचे सगळेच पदार्थ इथे बनले होते पण काय करायचे हे काही सुचत नव्हता मग काहीतरी चाट करायचा म्हणून मोड आलेल्या मिक्स कडधान्यांचे (रगडा - पॅटीस ) करायचे ठरवले Dhanashree Suki -
मुंबई स्पेशल रगडा पॅटीस (ragda patties recipe in marathi)
हा मुंबईचा एक स्ट्रीट फूड चा प्रकार आहे जो अबालवृद्ध सर्वांचाच आवडता पदार्थ आहे. स्ट्रीट फूड असुनही हा पदार्थ पौष्टिक आणि पोटभरीचा देखील आहे. आशा मानोजी -
भेळ (bhel recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूडस्ट्रीट फुड पैकी एक लोकप्रिय प्रकार आहे महाराष्ट्रात तर अगदी कानाकोपऱ्यात गल्लीपासून शहरापर्यंत भेळ हे एक प्रसिद्ध स्ट्रीट फूड आहे Sapna Sawaji -
छोले रगडा पॅटीस (chole ragda patties recipe in marathi)
#GA4 #week6या वीक मध्ये कीपॅड वरून छोले हा वर्ड ओळखून मी आजी रेसिपी बनवली आहे आमच्या घरात रगडा पॅटीस सगळ्यांना च आवडते आणि आज मी तुम्हाला पण त्याची रेसिपी सांगणार आहे Gital Haria -
शेव पुरी (sev puri recipe in marathi)
#KS8 थीम:8 स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र. रेसिपी क्र. 1#मुंबई स्ट्रीट फूड शेव पुरी Sujata Gengaje -
रगडा पॅटीस (Ragda Patties recipe in marathi)
# ट्रेडिंग रेसिपीज साठी मी आज माझी रगडा पॅटीस हि रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
रगडा पुरी (ragda puri recipe in marathi)
#WD आज महिला दिनाच्या निमित्ताने मी ही रेसिपी माझ्या बहिणीला डेडिकेट करत आहे या रेसिपीची आयडिया माझ्या बहिणीने मला दिली आहे. ही रेसिपी रगडा पॅटीस प्रमाणेच आहेत पण यात आपण बटाट्याचे पॅटीस न करता नुसता बटाटा मॅश करून घेऊन त्यामध्ये मसाला घालून करणार आहोत. Rajashri Deodhar -
-
मुंबई स्ट्रीट फूड फ्रॅंकी रोल (frankie roll recipe in marathi)
#ks8#स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र Sumedha Joshi -
More Recipes
टिप्पण्या