रगडा पापडी चाट (ragada papadi chat recipe in marathi)

Ragini Ronghe
Ragini Ronghe @cook_26452829

#GA4 #Week6
#Chat
चाट नक्कीच लहान मुलांपासून ते वृद्ध पर्यंत सर्वांच्याच आवडीचा आहे. मी प्रथमच चाट चा हा प्रकार बनवून बघितला आणि सर्वांना खूप आवडला.

रगडा पापडी चाट (ragada papadi chat recipe in marathi)

#GA4 #Week6
#Chat
चाट नक्कीच लहान मुलांपासून ते वृद्ध पर्यंत सर्वांच्याच आवडीचा आहे. मी प्रथमच चाट चा हा प्रकार बनवून बघितला आणि सर्वांना खूप आवडला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
4 सर्व्हिंग
  1. 1 वाटीपांढरे वाटाणे
  2. 3बटाटे
  3. 2कांदा
  4. 2टॉमॅटो
  5. चवीनुसार मीठ
  6. 1/2 टीस्पूनहळद
  7. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  8. 1/2 टीस्पूनजीरे पावडर
  9. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  10. 1 टीस्पूनआले लहसून पेस्ट
  11. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  12. 1पाकिट पापडी
  13. 1 वाटीबारीक शेव
  14. 1/2 टीस्पूनचाट मसाला
  15. 2 टेबलस्पूनतेल
  16. 1 वाटीगोड दही
  17. 1 वाटीपुदिना आणि मिरचीची चटणी
  18. 1/2 वाटीचिंच गुळाची चटणी
  19. पाणी

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    प्रथम पांढरे वाटाणे ८- १० तास भिजत घालावे. ८ ते १० तासांनी बटाटे चे साल काढून काप करून, बटाटे आणि भिजलेले वाटाणे कूकर ला २ -३ वाटी पाणी घाऊन १/४ टी स्पून मीठ आणि १/४ टी स्पून हळद टाकून ५ - ६ शिट्टी होईस्तोवर शिजवून घ्यावे.

  2. 2

    कांदा, टॉमॅटो बारीक चिरून घ्यावा.

  3. 3

    गॅस वर कढई मधे तेल तापले की त्यात चिरलेला कांदा, आल लहसुन पेस्ट परतून घ्यावी नंतर त्यात टोमॅटो परतून, तिखट, हळद, मीठ, गरम मसाला, जीरे पावडर, चाट मसाला घालून सगळ छान एकत्र परतून घ्यावे.नंतर त्यात कुकरला शिजलेले बटाटा आणि वाटाणे चे मिश्रण रवी नी एकजीव करून फोडणीत घालून छान मिक्स करून घ्यावे. आणि १०- १५ मिनटे छान उकळी काढून घ्यावी. वरून थोडी कोथिंबीर भुभुरावी. गरमा गरम रगडा तयार आहे.

  4. 4

    सगळे साहित्य तयार करून घ्यावे जसे पुदिना कोथिंबीर चटणी, गोड दही आणि चिंच गुळाची चटणी

  5. 5

    आता एका सर्व्हिंग प्लेटमध्ये किंवा बाऊल मधे तयार रगडा घेऊन त्या वर बारीक चिरलेला कांदा, टॉमॅटो, गोड दही, पुदिना चटणी, चिंचे ची चटणी, चाट मसाला, पापडी (बारीक करून), आणि सर्वात वर भरपूर शेव आणि कोथिंबीर भुरभुरून सर्व्ह करावे. खूपच टेस्टी अशी रगडा पापडी चाट तयार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ragini Ronghe
Ragini Ronghe @cook_26452829
रोजी

Similar Recipes