रगडा पॅटीस
#स्ट्रीट
कुकिंग सूचना
- 1
पाककृती
रगडा :
सर्वप्रथम वाटाणे रात्रभर भिजत घालावेत. सकाळी शिजवतानाच त्यात मीठ, हळद व आवडीप्रमाणे थोडे तिखट घालावे. ही उसळ मऊ शिजवून घ्यावी.
गॅसवर कढईत तेल गरम करून घेऊन त्यात थोडे आले-लसूण पेस्ट घालून परतून घेऊन, हळद, लाल तिखट, गरम मसाला, धने, जिरे पावडर टाकणे व नंतर शिजलेले वाटाणे पाण्यासकट घालावेत. रस दाट ठेवावा. - 2
पॅटीस :
उकडून घेललेले बटाटे सोलून किसून घ्यावेत. - 3
हिरवी मिरची, आले, लसूण याची पेस्ट करून ती किसलेल्या बटाट्यात घालावी.
चवीनुसार मीठ घालून सर्व एकत्र मिसळून घ्यावे. हा बटाट्याचा गोळा थोडा चिकट वाटल्यास ब्रेडचे दोन तुकडे थोडे ओले करून कुस्करून घालावेत किंवा ब्रेडचा चुरा घालावा. - 4
तयार मिश्रणाचे छोटे छोटे कटलेट्स करून शॅलो फ्राय करावेत.
सर्व्ह करताना एका डिशमध्ये दोन पॅटीस घेऊन त्यावर रगडा घालावा. त्यावर आवडीप्रमाणे गोड व तिखट चटणी घालावी. कोथिंबीर आणि बारीक शेवेने सजावट करावी
Keywords
Similar Recipes
More Recipes
















टिप्पण्या (2)