झटपट पाव भाजी

Supriya Gurav
Supriya Gurav @Suprehucook_24795666
Kalamboli

#cookpad
पाव भाजी बोला की यात्रेची आणि समुद्राची आठवण येतेच पावभाजी हि काही कार्यक्रम असला की झालीच पाहिजे चला ते मग बघुया झटपट पाव भाजी

झटपट पाव भाजी

#cookpad
पाव भाजी बोला की यात्रेची आणि समुद्राची आठवण येतेच पावभाजी हि काही कार्यक्रम असला की झालीच पाहिजे चला ते मग बघुया झटपट पाव भाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१तास
  1. ४मोठे बारीक चिरलेले कांदे
  2. ३ बारीक चिरलेले टोमॅटो
  3. २बारीक चिरलेली सिमला मिरची
  4. १/४कप बारीक चिरलेला फ्लॉवर
  5. १/४ कप मटार
  6. २बटाटी
  7. ३टेबलस्पून पाव भाजी मसाला
  8. २टेबलस्पून लाल मिरची पावडर
  9. आवश्यकतेनुसार बटर
  10. ४टेबलस्पून तेल
  11. आवश्यकतेनुसार मीठ
  12. आवश्यकतेनुसार पाणी
  13. ३लादी पाव
  14. आवश्यकतेनुसार कोथिंबीर
  15. १लिंबू

कुकिंग सूचना

१तास
  1. 1

    सर्व प्रथम शिमला मिरची,मटार, बटाटी, फ्लॉवर ह्या सगळ्या भाज्या वाफवून घ्या. त्यातलं पाणी तसाच ठेवायचं मग कांदे बटाटे बारीक चिरलेली

  2. 2

    पॅन मधे तेल टाकून गरम झाल्यावर त्यात कांदा टाका लालसर थोडा झाल्यावर त्यात टोमॅटो पाव भाजी मसाला,लाल मिरची पावडर टाका मग चांगलं परतून घ्या मसाले जळू नये म्हणून त्यात थोडं पाणी टाका.

  3. 3

    मग चागलं शिजल्यावर त्यात सगळ्या भाज्या टाका आणि परत चांगलं परतून घ्या मग मग थोडा त्यात पाणी टाका.मग चांगलं मॅश करून घ्या सगळ्या भाज्या

  4. 4

    मग भाज्या चांगल्या मॅश झाल्यावर त्यात मीठ टाका मग थोडा बटर टाका आणि कोथींबीर टाका मग.तयार मस्त गरम गरम झटपट पावभाजी
    पावाला मस्त बटर लावून गरम करून घ्या. खाताना मस्त लिंबू पिळून घ्यावा खूप छान लागते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Gurav
Supriya Gurav @Suprehucook_24795666
रोजी
Kalamboli

Similar Recipes