पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
Navi mumbai

#CDY बालदिन विशेष रेसिपी चॅलेंज या कीवर्ड साठी मी आज माझ्या मुलाला आवडणारी पाव भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे.

पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)

#CDY बालदिन विशेष रेसिपी चॅलेंज या कीवर्ड साठी मी आज माझ्या मुलाला आवडणारी पाव भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 - 40 मिनिटे
तीन
  1. 400 ग्रॅममटार
  2. 250 ग्रॅमफ्लॉवर
  3. 250 ग्रॅमबटाटे
  4. 300 ग्रॅमकांदे
  5. 100 ग्रॅमसिमला मिरची
  6. 250 ग्रॅमटोमॅटो
  7. 1 चमचाआले लसूण पेस्ट
  8. 1 चमचाएव्हरेस्ट पाव भाजी मसाला
  9. 2पाकिट अमुल बटर
  10. 4लादी पाव
  11. 2 टेबलस्पून तेल
  12. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

30 - 40 मिनिटे
  1. 1

    प्रथम सर्व भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या. मग फ्लॉवरचे तुरे काढून पाण्यात ठेवले. बटाट्याची साले काढून घेतली. टोमॅटो बारीक चिरून घेतले. कांदे बारीक चिरून घेतले.

  2. 2

    नंतर मटार, फ्लॉवर,बटाटे शिजवून घेतले. थोडे तेल व बटर घालून त्यावर बारीक चिरलेला कांदा परतून घेतला. मग त्यात आले लसूण पेस्ट घालून चांगले परतून घेतले.

  3. 3

    मग वाफवून घेतलेल्या सगळ्या भाज्या स्मॅश करुन घातल्या. व सर्व भाज्या चांगल्या परतून घेतल्या. नंतर मिक्सर मधे बारीक वाटून घेतलेले टोमॅटो व एव्हरेस्ट पावभाजी मसाला घालून चांगले परतून घेवून एक उकळी काढून घेतली. वरून पुन्हा बटर व बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. चवीनुसार मीठ घालून गॅस बंद केला.

  4. 4

    नंतर बेकरी मधून आणलेले नरम पाव मधे सुरीने कापून त्यावर बटर लावून गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी चांगले गरम करून घेतले.

  5. 5

    पावभाजी सर्व्ह करताना एका प्लेट मधे बारीक चिरून घेतलेला कांदा, लिंबाची फोड व बटर लावून तव्यावर गरम करून घेतलेल्या पावाबरोबर आनंद घ्या गरमा गरम पाव भजी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
रोजी
Navi mumbai

टिप्पण्या

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
धन्यवाद आर्या ताई, ज्योत्स्ना ताई, चेतना ताई.

Similar Recipes