ओट्स गुलकंद मोदक (oil free) (oats gulkand modak recipe in marathi)

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

#AsahiKaseiIndia
आज मी खास गणपती बाप्पासाठी ओटसचे मोदक बनविले. मग ते जरा पौष्टिक बनविले तर .... असा माझ्या मनात विचार आला आणि मग मी हे ओट्सचे गुलकंद, ड्रायफ्रूटस सारण घालून मोदक बनविले. चवीलाही अप्रतिम आणि थोड्या साहित्यात झटपट होणारे असे हे ऑइल फ्री ओट्स गुलकंद मोदक.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 100 ग्रामओट्स
  2. 1 टेबलस्पूनमिल्क पावडर
  3. 1/4 कपकंडेन्स मिल्क
  4. 1/4 टीस्पूनवेलची पूड
  5. 1 टेबलस्पूनगुलकंद
  6. 1 टेबलस्पून+2 टेबलस्पूनड्रायफ्रुट्सचे तुकडे
  7. तुकडेसजावटीसाठी पिस्त्याचे काप व चेरीचे

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम पॅनवर ओट्स चांगले भाजून घ्या. त्यातच २ टेबलस्पून ड्रायफ्रूट्सचे तुकडे घालून भाजा. नंतर पूर्णपणे थंड झाल्यावर मिक्सरमध्ये पल्स मोडवर चालुबंद करत पावडर करून घ्या.

  2. 2

    ती पावडर ताटात घेऊन त्यात मिल्क पावडर, वेलचीपूड, कंडेन्स मिल्क थोडे थोडे घालून थोडं सैलसर मळून घ्या. (कंडेन्स मिल्क मध्ये साखर असल्यामुळे मी इथे साखर वापरली नाही, तुम्हाला गोड कमी वाटल्यास थोडी टाकू शकता.)

  3. 3

    सारणासाठी गुलकंद घेऊन त्यात ड्रायफ्रूट्सचे तुकडे टाका, मिक्स करा, हे झाले सारण तयार. मोदक साच्यात पिस्त्याचें काप व चेरीचे तुकडे लावून वरील मळलेला छोटा गोळा घेऊन मोदक साच्यात खोलगट दाबून घ्या. मध्ये गुलकंदाचे सारण भरून बंद करा. अलगद साच्यातून मोदक काढा. मस्त पौष्टिक असे ऑइल फ्री ओट्स गुलकंद मोदक तयार आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Hezal Sagala
Hezal Sagala @cook_28153299
Definitely I will go for this.....on Ganesh chaturthi 🥰🙏

Similar Recipes