कोकोनट गुलकंद मोदक (coconut gulkand modak recipe in marathi)

Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786

#रेसिपीबुक #week10 "गणपती बाप्पा मोरया"🙏🌹 ll वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्वीघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा ll घरोघरी बाप्पांचे आगमन झालेले आहे. आता घरोघरी रोज गणपतीबाप्पाला गोड-धोड मोदकांचा नैवेद्य राहणार.माझ्या घरी गणपती बसत नाही. पण माझ्या मुलाला बाप्पा फार आवडतात. मुलालाच काय मलाही आवडतात. माझा मुलगा दरवर्षी क्ले पासून गणपती तयार करतो. तेव्हा या विघ्नहर्ता बाप्पांना मी बसण्याच्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी मोदकाचा नैवेद्य करत असते. तेव्हा पहील्या दिवशी मी कोकोनट गुलकंद मोदक केले. खूप छान लागतात.चला तर मग बघुया कोकोनट गुलकंद मोदक😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनीटे
4,5 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपडेसिकेटेड कोकोनट
  2. 1/2 टीस्पूनऑरेंज फुड कलर
  3. 3 टेबलस्पूनकंडेन्स मिल्क
  4. 5,6 ड्रॉपरोज इसेन्सचे
  5. 1 टेबलस्पूनगुलकंद
  6. 1 टीस्पूनबारीक केलेले बदाम
  7. 1 टीस्पूनबारीक केलेले काजू

कुकिंग सूचना

10 मिनीटे
  1. 1

    सर्वप्रथम डेसिकेटेड कोकोनट घेऊन त्यामध्ये मिल्कमेड, फूड कलर, इसेन्स टाकून मिक्स करून घ्यावे.

  2. 2

    नंतर त्या मिश्रणाची पाती करून त्यामध्ये गुलकंद भरून त्याचा मोदक तयार करून घेणे. गुलकंदामध्ये काजू आणि बदामाचं बारीक काप टाकणे.

  3. 3

    अशाच प्रकारे गुलकंदाचे सारण भरून बाकीचे सर्व मोदक तयार करून घ्यावेत. पाकळ्या छान होण्यासाठी मी टूथपीकचा वापर केला. खालील फोटोत दाखवल्याप्रमाणे तुम्ही मोदकाच्या पाकळ्या तयार करू शकता. आता आपले बाप्पांसाठी मोदक तयार झालेले आहेत. बाप्पांना नैवेद्य दाखवून सर्वांना प्रसाद वाटून आपणही प्रसाद ग्रहण करावा 🙏😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes