वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)

Ashwini Anant Randive
Ashwini Anant Randive @Ashwini

#cpm5
वांगी बटाटा रस्सा भाजी लग्नाच्या पंक्तीतील सर्वांच्याच आवडीची भाजी आहे. कोणताही कार्यक्रम असो वांगे आणि बटाटा भाजी शिवाय तो पूर्णच होऊ शकत नाही चला तर मग पाहूया त्याची रेसिपी

वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)

#cpm5
वांगी बटाटा रस्सा भाजी लग्नाच्या पंक्तीतील सर्वांच्याच आवडीची भाजी आहे. कोणताही कार्यक्रम असो वांगे आणि बटाटा भाजी शिवाय तो पूर्णच होऊ शकत नाही चला तर मग पाहूया त्याची रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
चार जणांसाठी
  1. 4वांगी
  2. 1बटाटा
  3. 1कांदा
  4. 1 चमचालसूण
  5. 2चमच्या खोबरं
  6. 1/2 चमचाआले
  7. 2 चमचेशेंगदाणा कूट
  8. 1 चमचाकाळ तिखट
  9. 1 चमचालाल तिखट
  10. 1/2 चमचामोहरी
  11. 1/2 चमचाजीरे
  12. 1/4 चमचाहिंग
  13. 1 चमचामीठ
  14. 1 चमचातेल
  15. 10-12 कडीपत्ता पाने
  16. 1/2 चमचाधने पावडर
  17. 2 चमचेकोथिंबीर
  18. 1टोमॅटो
  19. 1/2 चमचाहळद

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    सर्वात अगोदर वांगी बटाटा कांदा टोमॅटो फोटोत दाखविल्याप्रमाणे कापून घेणे. आले लसुन खोबरे मिक्सरला वाटून घेणे

  2. 2

    कढईत तेल टाकून तेल तापले की त्यात मोहरी,जीरे, कढीपत्ता,कांदा,आले लसूण खोबऱ्याचे वाटण टाकून छान परतून घेणे. कांदा गुलाबी रंगावर परतून घेणे.

  3. 3

    कांदा छान परतला की त्यात काळ तिखट लाल तिखट टाकून मग टोमॅटो,बटाटे घालून थोडे शिजू देणे मग त्यात वांगी टाकून छान परतून घेणे. थोडेसे पाणी टाकून झाकून वाफेवर वांग आणि बटाटा शिजवून घेणे

  4. 4

    लागेल एवढे पाणी टाकून छान शिजवून घेणे आता त्यात शेंगदाणा कूट, मीठ टाकून दोन मिनिटे उकळून घेणे.

  5. 5

    ही वांगे बटाट्याची भाजी चपाती भाकरी किंवा भाताबरोबर ही छान लागते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ashwini Anant Randive
रोजी

Similar Recipes