पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)

Rupali Dongare
Rupali Dongare @cook_31422358

तशी आमच्या घरामध्ये पाव भाजी सगळ्यांना आवडते .आठवड्यातून एकदा तरी पावभाजी होते तर आज मी तुमच्याबरोबर पाव भाजीची रेसिपी शेअर करते.

पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)

तशी आमच्या घरामध्ये पाव भाजी सगळ्यांना आवडते .आठवड्यातून एकदा तरी पावभाजी होते तर आज मी तुमच्याबरोबर पाव भाजीची रेसिपी शेअर करते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तीस मिनिट
  1. 1 वाटीहिरवा वाटाणा
  2. 4उकडलेले बटाटे
  3. 1शिमला मिरची
  4. 2टोमॅटो
  5. 1 वाटीफ्लॉवर
  6. 2बारीक चिरलेला कांदा
  7. बारीक चिरलेली कोथिंबीर
  8. 2 चमचेलाल तिखट
  9. 1/4 चमचाहळद
  10. 2 चमचेपावभाजी मसाला
  11. फोडणीसाठी तेजपत्ता जीरे मोहरी दालचिनी दोन लवंग चाार मिरे
  12. बटर मीठ चवीनुसार आणि लादी पाव
  13. आलं लसूण पेस्ट

कुकिंग सूचना

तीस मिनिट
  1. 1

    प्रथम बटाटे,वटाणा, सिमला मिरची, फ्लॉवर बारीक चिरुन कुकरला शिजवून घेणे.त्यानंतर गॅस वर ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल तापल्यानंतर तेज पत्ता दालचिनी जीरा मोहरी टाकून परतून घ्या. नंतर त्यामध्ये चिरलेला कांदा टाका,कांदा सॉफ्ट होई पर्यंत परता.झाल्यानंतर टोमॅटोची पेस्ट, आले लसूण पेस्ट घालून 5 मिनिट पुन्हा परता.

  2. 2

    कांदा टोमॅटो परतून झाल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, हळद,पावभाजी मसाला पुन्हा परता.त्यानंतर त्यामध्ये शिजवलेले वाटाणे,सिमला मिरची स्मॅश करून टाका हे सगळे मसाला मध्ये परतून घ्या.त्यानंतर बटाटे स्मॅश करून टाका.दहा मिनिटे ही भाजी बारीक गॅसवर शिजू द्या त्यानंतर वरतून कोथिंबीर टाका.

  3. 3

    गरमागरम पावभाजी बटर लावलेल्या पाव बरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rupali Dongare
Rupali Dongare @cook_31422358
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes