बटर पावभाजी (Butter pavbhaji recipe in marathi)

प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
प्राची मलठणकर (Prachi Malthankar) @thewarmPlate
Frisco Texas

#स्ट्रीट
स्ट्रीट फूड म्हटल की मुंईतील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खाऊच्या गाड्या दिसतात. वडापाव, पावभाजी, तवा पुलाव, चाट किती तरी पदार्थ डोळ्यासमोर येतात. असच मी आज तुम्हाला दाखवते मुंबईची पावभाजी एक्स्ट्रा बटर मारके. चला मग बघू कशी करायची .

बटर पावभाजी (Butter pavbhaji recipe in marathi)

#स्ट्रीट
स्ट्रीट फूड म्हटल की मुंईतील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खाऊच्या गाड्या दिसतात. वडापाव, पावभाजी, तवा पुलाव, चाट किती तरी पदार्थ डोळ्यासमोर येतात. असच मी आज तुम्हाला दाखवते मुंबईची पावभाजी एक्स्ट्रा बटर मारके. चला मग बघू कशी करायची .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2बटाटे
  2. 1मोठा कांदा
  3. 1सिमला मिरची
  4. 2टोमॅटो
  5. ५/६ लसूण पाकळ्या
  6. 1 कपफ्लॉवर
  7. 1 कपहिरवा मटर
  8. 2 टेबलस्पूनपावभाजी मसाला. (मी एव्हरेस्ट वापरते)
  9. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  10. गारनिशिंग साठी
  11. बारीक चिरलेली कोथींबीर, कांदा
  12. लिंबाची फोड
  13. गरजेनुसारबटर
  14. गरजेनुसारलादी पाव

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम सर्व भाज्या स्वच्छ धुवाव्यात. मग चिरव्यात व कूकर मध्ये शिजवुन घ्याव्यात.भाज्या शिजल्या की त्याचे पाणी वेगळ्या भांड्यात गाळून घ्यावे. शिजलेल्या भाज्या म्याशर नी चांगल्या मॅश कराव्यात.

  2. 2

    मग एका पॅन मध्ये थोड बटर घेऊन त्यात चिरलेला कांदा घालावा व चांगला परतावा. मग लसूण ची पेस्ट घालवी.कांदा लसूण लालसर झाले की शिजवलेल्या भाज्या त्यात घालून परतावे. मग पावभाजी मसाला, लाल तिखट व मीठ घालावे.भाजी खूप घट्ट वाटल्यास जे भाज्यांचे पाणी आपण बाजूला काढले होते ते घालून पातळ करावी. खूप पातळ करू नये.

  3. 3

    मग लादी पावाना दोन्ही साईडनी बटर लावून तवा गरम करावा व त्यावर दोन्ही साईडनी शेकावेत. मग एका ताटात भाजी, पाव, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, लिंबू सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
रोजी
Frisco Texas

टिप्पण्या (3)

Sonal yogesh Shimpi
Sonal yogesh Shimpi @cook_23394308
ही रेचेपि प्राची ताई ची आहे बेटर पाव bhaji

Similar Recipes