पावभाजी (Pav Bhaji Recipe in Marathi)

Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786

#स्ट्रीटफूड.... पावभाजी करण्यासाठी तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यांची निवड करू शकता .माझ्या घरी ज्या भाज्या अव्हेलेबल होत्या मी त्या भाज्यांचा वापर पावभाजीची भाजी करण्यासाठी केलेला आहे. बीट टाकल्याने भाजीला छान कलर येतो. पावभाजी मध्ये लागणारा पावभाजी मसाला मी घरीच तयार करून घेतलेला आहे. त्याची पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. हा पदार्थ लहान-मोठे सर्वांच्या आवडीचा त्यामुळे घरोघरी पाव भाजी केली जाते आणि बाहेरही आवडीने खाल्ली जाते.

पावभाजी (Pav Bhaji Recipe in Marathi)

#स्ट्रीटफूड.... पावभाजी करण्यासाठी तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यांची निवड करू शकता .माझ्या घरी ज्या भाज्या अव्हेलेबल होत्या मी त्या भाज्यांचा वापर पावभाजीची भाजी करण्यासाठी केलेला आहे. बीट टाकल्याने भाजीला छान कलर येतो. पावभाजी मध्ये लागणारा पावभाजी मसाला मी घरीच तयार करून घेतलेला आहे. त्याची पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. हा पदार्थ लहान-मोठे सर्वांच्या आवडीचा त्यामुळे घरोघरी पाव भाजी केली जाते आणि बाहेरही आवडीने खाल्ली जाते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. भाज्या
  2. 2गाजर
  3. 2मिरची हिरवी
  4. 2शिमला मिरची
  5. 1/2 वाटीचिरलेली पत्तागोबी
  6. 2बटाटे
  7. 2वांगी
  8. 2टमाटर
  9. 1/2 वाटीहिरवा वाटाणा
  10. 2कांदे
  11. 1/2 वाटीचिरलेली कोथिंबीर
  12. 1/2 टेबल स्पूनकस्तुरी मेथी
  13. 1 टेबल स्पूनअद्रक लसणाची पेस्ट
  14. 1 टेबल स्पूनतिखट
  15. हाफ टीस्पून हळद
  16. मीठ चवीनुसार
  17. 2पॅकेट पाव
  18. 4 टेबलस्पूनभाजीसाठी बटर
  19. 1/4शेकण्यासाठी वेगळं बटर
  20. पावभाजी मसाला साहित्य
  21. 1 टीस्पूनजिरे
  22. 1टिस्पून मिरे
  23. 1 टीस्पूनबडीसोफ
  24. 2 टेबलस्पूनतिखट चवीनुसार
  25. 1/2 टी स्पूनहळद
  26. 2 टेबल स्पूनआमचूर पावडर
  27. चिमुटभर हिंग
  28. 4तेजपान
  29. सहा-सात लवंग
  30. 4छोटी विलायची
  31. 1मोठी विलायची

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम वरील सर्व भाज्या स्वच्छ धुवून चिरून घ्याव्यात... शिमला मिरची आणि कांदा थोडा बारीक चिरून घ्यावा.

  2. 2

    नंतर शिमला मिरची आणि कांदा सोडून बाकी सगळ्या भाज्या कुकरमध्ये दोन टेबलस्पून तेल अर्धा टेबल स्पून जीर टाकून तेलात परतून घ्याव्यात. नंतर त्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून शिजवून घ्याव्यात.

  3. 3

    नंतर एका कढईत चार टेबलस्पून बटर टाकावे. त्त्यात कांदा,शिमला मिरची,अद्रक लसणाची पेस्ट हे क्रमाक्रमाने टाकून छान परतून घ्यावे.

  4. 4

    कांदा छान गुलाबी झाल्यावर शिमला मिरची छान शिजल्यावर त्यामध्ये तिखट,थोडीशी हळद पावभाजी मसाला,मीठ,थोडीशी कोथिंबीर, कस्तुरी मेथी टाकून परत हे मसाले छान होऊ द्यावेत.

  5. 5

    नंतर या जिन्नसामध्ये कुकर मध्ये शिजवून घेतलेल्या भाज्या छान स्मॅश करून घ्याव्यात. व भाजी छान शिजू द्यावी. त्यानंतर इकडे तव्यावर बटर टाकून पाव छान शेकून घ्यावा

  6. 6

    नंतर एका प्लेटमध्ये भाजीवर छान कोथिंबीर,कांदा, लिंबाचा रस पिळावा व ती भाजी गरमागरम बटर लावून दिलेल्या पावासोबत खाण्याचा आनंद घ्यावा.

  7. 7

    आता पावभाजीच्या मसाल्याची कृती.... वरील सगळे खडे मसाले कमी गॅसवर तव्यावर छान भाजून घ्यावेत. पावडर मसाले यात टाकू नयेत.

  8. 8

    मसाले भाजून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्यावेत

  9. 9

    मसाला थंड झाल्यावर मिक्सर च्या पोट मध्ये टाकावेत व त्यामध्येच पावडर मसाले तिखट हळद,आमचूर पावडर, हिंग टाकून बारीक करून घ्यावेत. अशाप्रकारे घरच्या घरी आपला पाव भाजी मसाला अगदी झटपट तयार होतो. आणि हवाबंद डब्यात ठेवल्यास नेहमी वापरता पण येतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786
रोजी

टिप्पण्या (2)

CLASH VLASH
CLASH VLASH @cook_26458432
nice recipe of pav bhaji I loved it very much..your recipe is better than this recipe https://marathichatka.blogspot.com/2020/09/pav-bhaji-recipe-in-marathi.html
(संपादित)

Similar Recipes